खासदार अमोल कोल्हे यांचे बंधु सागर कोल्हे यांनी माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सागर कोल्हे यांच्या प्रतिमेस शिवसैनिकांच्या वतीने जोडे मारो आंदोलन


खासदार अमोल कोल्हे यांचे बंधु सागर कोल्हे यांनी माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील  यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सागर कोल्हे यांच्या प्रतिमेस शिवसैनिकांच्या वतीने जोडे मारो आंदोलन

खासदार अमोल कोल्हे यांचे बंधु सागर कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील  यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सागर कोल्हे यांच्या प्रतिमेस  शिवसैनिकांच्या वतीने जोडे मारो आंदोलन  करण्यात आले

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी  :

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांचे बंधु सागर कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील  यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सागर कोल्हे यांच्या

 प्रतिमेस  शिवसैनिकांच्या वतीने जोडे मारो आंदोलन  करण्यात आले . शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांच्या वतीने शिरुर शहरातील जुन्या नगर पुणे रोडवर  आस्वाद हॉटेल समोर  करण्यात आलेल्या  आंदोलनास शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे सल्लागार अनिल काशीद, उप जिल्हाप्रमुख पोपट शेलार, उपतालुका प्रमुख आनंदराव हजारे, अमोल हरगुडे, महिला आघाडीच्या सुमन वाळुंज यासह शिरुर तालुका व शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघातील जनतेची पंधरा वर्षे  अविरतपणे सेवा करणारे शिवसेना उपनेते व माजी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्‍या बद्दल खासदार अमोल कोल्हे यांचे बंधु सागर कोल्हे यांनी एकेरी उल्लेख करुन सुसंस्कृत नसल्याचा दाखला दिला असुन शिरुर . लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत असुन यापुढे असा अपमान खपवुन घेतला जाणार नसल्या चा इशारा  शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार यांनी दिला आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News