दौंड शहरात कोरोनाचा कहर सुरूच, एका दिवसात 20 जण पॉझिटिव्ह


दौंड शहरात कोरोनाचा कहर सुरूच, एका दिवसात 20 जण पॉझिटिव्ह

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: दौंड शहरासह परिसरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे, शुक्रवार दिनांक 12 /3 /2019 रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 104 लोकांचे अँटीजेण तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल 20 जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली आहे, त्यामध्ये शहरातील नऊ तर परिसरातील अकरा रुग्ण आहेत, सोळा पुरुष आणि चार महिलांचा या रुग्णांमध्ये समावेश आहे, त्यामध्ये PTS नानविज 3,गोपळवाडी 3, कुरकुंभ 1, खोरवडी 2, तुकाई नगर 2 असे 11जण दौंड शहर परिसरातील आहेत, तर 9 शहरातील आहेत, गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरुवात असताना सुद्धा एवढे पेशंट सापडले नव्हते एवढे पेशंट या मार्च महिन्यात सापडत आहेत ही धोक्याची घंटा आहे नागरिकांनी सावधानता बाळगणे काळाची गरज असून नियमांचे पालन काटेकोरपणे करावेच लागणार आहे असे डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे. नियमांचे पालन न झाल्यास पुन्हा एकदा कडक निर्बंध करावे लागतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News