रासनेनगर येथील श्री शिव गणेश मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे महाआरती


रासनेनगर येथील श्री शिव गणेश मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे महाआरती

नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेतर्फे श्री शिव गणेश मंदिरात रा.स्व.संघाचे अरुणराव धर्माधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,मुकुल गंधे,बजरंग दलाचे गौतम कराळे,सक्षमचे निलेश चिपाडे,भारत थोरात,अशोक पवार,ज्ञानेश्वर मगर,दीपक पोळ,विवेक पाठक,पुरोहित भणगे गुरु आदींसह भाविक.(छाया-अमोल भांबरकर)            

अहमदनगर प्रतिनिधी संजय सावंत  :                                               नगर महाशिवरात्री निमित्त रासनेनगर येथील श्री शिव गणेश मंदिरात सकाळी लघु रुद्राभिषेक व जलाभिषेक करण्यात आला.मंदिरात रांगोळी काढून उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती.मंदिरात सकाळ पासूनच भाविकांची रांग लागली होती.येणाऱ्या भाविकांसाठी आंतर पथ्य पाळून गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन मंदिरात दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेतर्फे श्री शिव गणेश मंदिरात रा.स्व.संघाचे अरुणराव धर्माधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,मुकुल गंधे,बजरंग दलाचे गौतम कराळे,शहरसह मंत्री श्रीकांत नांदापूरकर,सक्षमचे निलेश चिपाडे,राजेंद्र चुंबळकर,भारत थोरात ,अशोक पवार,ज्ञानेश्वर मगर,दीपक पोळ,विवेक पाठक,पुरोहित भणगे गुरु आदींसह भाविक उपस्थित होते.महाशिवरात्रीचे औचित्त साधून मंदिराच्या परिसरात हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षचे रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.                                                                      

जाहिरात
Search
विडिओ
Recent News