सावित्रीबाई फुले समतेचा पुरस्कार करणार्‍या थोर समाजसेविका होत्या - बाळासाहेब भुजबळ


सावित्रीबाई फुले समतेचा पुरस्कार करणार्‍या थोर समाजसेविका होत्या - बाळासाहेब भुजबळ

- सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त ओबीसी, व्हीजे,एनटी जनमोर्चाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुषमा पडोळे,  भगवान फुलसौंदर, अशोक दहिफळे, सुनिल भिंगारे आदि.

अहमदनगर प्रतिनिधी संजय सावंत - आद्यसमाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या समतेच्या चळवळीत केवळ पत्नी म्हणून नव्हे तर समतेचा पुरस्कार करणार्‍या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले होत्या. फुले दांम्पत्यांचे जीवन चरित्र समतेचा खरा अर्थ प्राप्त करुन देते. पण, आज संकुचित वृत्तीने विशिष्ट जातीला लक्ष करुन कोणाला पुरोगामी होता येणार नाही, असे मत ओबीसी, व्हीजे,एनटी जनमोर्चाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केले.

संघटनेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन माळीवाडा येथील महात्मा फुले विद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी श्री.भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नगरसेवक बाळासाहेब बोराटे होते. प्रारंभी सुषमाताई पडोळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन श्री.बोराटे,  माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक अशोक दहिफळे आदिंची समयोचित भाषणे झाली. श्रीकांत मांढरे यांनी संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली.  सर्वश्री काका शेळके, रमेश सानप, डॉ.सुदर्शन गोरे,  सुनिल भिंगारे, सुनिल जाधव, फिरोज शफी खान, राजेंद्र पडोळे, परेश लोखंडे, रवी चवंडके, कैलास गर्जे, सचिन म्हस्के, अभिजित कांबळे, श्रीमती रजनी ताठे आदि उपस्थित होते.  

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News