शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराद्य दैवत श्री रामलिंग महाराज यांची महाशिवरात्रीला भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करून मंदिर बंद ठेवण्यात आल्याने यंदा प्रथमच भाविकांविना यात्रा शांततेत संपन्न झाली


शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराद्य दैवत श्री रामलिंग महाराज यांची महाशिवरात्रीला भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करून मंदिर बंद ठेवण्यात आल्याने यंदा प्रथमच भाविकांविना यात्रा शांततेत संपन्न झाली

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:

शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराद्य दैवत श्री रामलिंग महाराज यांची महाशिवरात्रीला भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करून मंदिर बंद ठेवण्यात आल्याने यंदा प्रथमच भाविकांविना यात्रा शांततेत संपन्न झाली.

          श्री क्षेत्र रामलिंग ता.शिरूर येथील श्री रामलिंग महाराज यांची महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिरूर शहरातुन भव्य सवाद्य पालखी मिरवणुक निघते व महाशिरात्रीच्या दिवशी पहाटे पालखी मिरवणुक रामलिंग येथे पोहचल्यानंतर महाअभिषेक झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करून दिले जाते.महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येथे पुणे व नगरसह इतर जिल्ह्यातुन हजारो भाविक भक्त येत असतात.परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता.

             गुरूवार दि.११ रोजी महाशिवरात्रीनिमित्त शहरातील शिवसेवा मंदिर येथुन पहाटे तीन वाजता आरती करून टेम्पोमधुन श्री रामलिंग महाराजांची पालखीचे प्रस्थान जुने शिरूर रामलिंग येथे पहाटे साडेतीन वाजता पालखी आल्यानंतर महाअभिषेक व महाआरती उद्योगपती व श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या हस्ते व सचिव तुळशीराम परदेशी, खजिनदार पोपटराव दसगुडे, सदस्य गोदाजीराव घावटे, रावसाहेब घावटे, वाल्मीकराव कुरुंदळे, बलदेवसिंग परदेशी, नामदेवराव घावटे, सल्लागार जगन्नाथ पाचर्णे, कारभारी झंझाड, बबनराव कर्डिले   आदि विस्वस्तांच्या उपस्थित करण्यात आली.मंदिर परिसरात भाविकांची गर्दि होऊ नये म्हणुन पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक किरण उंदरे,पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,सुनिल मोटे यांसह शिरूर पोलीसांनी चोख बंदोबस्त दिला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News