महामार्गावर वाहन चालक व वाटसरू यांना मारहाण करून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद


महामार्गावर  वाहन चालक व वाटसरू यांना  मारहाण करून लुटणारी  टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

महामार्गावर  वाहन चालक व वाटसरू यांना  मारहाण करून लुटणारी  टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधि:

महामार्गावर  वाहन चालक व वाटसरू यांना  मारहाण करून लुटणारी  टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली

      याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  1)अमर चिलू कांबळे  वय 26 राहणार मुकुंदनगर  नेवासाफाटा नेवासा  जिल्हा अहमदनगर  ,2) विराज उर्फ पिल्या निवृत्ती नवगिरे वय 26 राहणार  रानमसले नानज तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर 3)संकेत उर्फ ऋषिकेश बाळू वन कळस वय 19 राहणार रामवाडी पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.वाहनांमध्ये नागापूर एमआयडीसी अहमदनगर येथून माल भरुन भोसरी पुणे येथे जाण्यासाठी निघाले असता जानवी हॉटेल शिरूर जवळ त्यांनी त्यांचे वाहन चढामुळे सावकाश चालवत असताना त्यांना पाठीमागून आलेल्या दोन जणांनी त्यांचे वाहन थांबवुन त्यांचे हातावर तोंडावर मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवून  त्यांच्याकडील एक विवो कंपनीचा मोबाइल  ,एक सॅमसंग कंपनीचा मोबाइल  तसेच रोख ८३३० रुपये जबरीने चोरून निघून गेले  बाबत चंद्रकांत नानाभाऊ आजबे  वय 37  राहणार  नागापूर एमआयडीसी अहमदनगर यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दि.२८ जानेवारी २०२१ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

               सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहिती वरून सदरचा गुन्ह्यातील  चोरीस गेलेला मोबाईल हा आरोपी वापरत असल्याची गोपनीय माहिती मिळालेने  त्यास पुणे येथून  ताब्यात घेण्यात आले त्याचेकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये  त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार  यांचे मदतीने केल्याची कबुली दिली दिली असून गुन्ह्यातील चोरलेले मोबाईल  जप्त करण्यात आले आहेत  सदरच्या आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे  रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतकेल्याची कबुली दिली आहे आरोपींना पुढील तपास कामी शिरूर पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,सपोनि सचिन काळे,सहा.फौज दत्तात्रय गिरमकर,पो.हवा. जनार्दन शेळके,उमाकांत कुंजीर,ज्ञानेश्वर शिरसागर,सचिन गायकवाड,पो.ना.राजू मोमिन,अजित भुजबळ,पो.ना.मंगेश थिगळे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News