महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक महामंडळाला अर्थसंकल्पात केली 100 कोटींची तरतुद


महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक महामंडळाला अर्थसंकल्पात केली 100 कोटींची तरतुद

श्रीगोंदा  प्रतिनिधी  अंकुश तुपे:-नुकत्याच महाविकास आघाडी सरकारने जाहीर कलेल्या अर्थसंल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री  अजित दादा पवार यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ,संत रोहिदास चर्मकार महामंडळ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळ व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यासाठी अर्थसंकल्पात प्रत्येकी 100 कोटी रुपयांची तरतूद केली.याशिवाय क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यातील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाबाबत बैठक घेऊन ते वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचही दादांनी आश्वस्त केलं .त्यामुळ महाविकास आघाडी सरकार हे सर्व समाज घटकाच्या विकासासाठी काम करत आहे हे स्पष्ट  होत आहे.

    वरील महामंडळांच्या निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयदेव गायकवाड तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप व सर्व पदाधिकऱ्यांच्या वतीने मा.ना अजित दादा पवार व मा. जयदेव गायकवाड तसेच पंडित कांबळे,अभिजित ससाणे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News