दौंड पोलीस स्टेशन आणि महसूल विभागाची लक्षवेधी दबंग कारवाई 55 लाखाच्या 6 बोटी फोडल्या


दौंड पोलीस स्टेशन आणि महसूल विभागाची लक्षवेधी दबंग कारवाई 55 लाखाच्या 6 बोटी फोडल्या

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील वाळू माफिया वर महसूल विभाग, पोलीस उपविभागीय कार्यालय, दौंड पोलीस स्टेशन यांनी प्रत्येक ठिकाणी कारवाई करण्याचा धडाकाच लावला आहे, 2021सालात जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये अशाच कारवाई झाली असून मार्च महिन्यात देखील कारवाई केल्या जात आहेत, काल वाटलुज खानोटा या ठिकाणी तहसीलदार संजय पाटील दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी संयुक्तरित्या कारवाई करून 50 ते 55 लाखाच्या बोटी फोडल्या आहेत,या कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, पोलीस हवालदार आसिफ शेख, पोलीस नाईक राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते,पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी, तर महसूल विभागाकडून तहसीलदार संजय पाटील, मंडलाधिकारी मंगेश नेवसे, दादा लोणकर, विनोद धांडोरे, सुनील जाधव, महेश गायकवाड, हरिश्‍चंद्र फरांदे,विजय खारतोडे, संतोष खोसे,सचिन जगताप, संदीप शिंगाडे, दुष्यंत पाटील, आनंद ढगे, अर्जुन स्वामी या सर्वांनी मिळून संयुक्तरित्या ही  कारवाई केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News