इतिहास कालीन अनमोल किमतीची सोन्याची नाणी पोलिसांकडून जप्त, गुन्हे शाखा युनिट 2 ची कौतुकास्पद कारवाई


इतिहास कालीन अनमोल किमतीची सोन्याची नाणी पोलिसांकडून जप्त, गुन्हे शाखा युनिट 2 ची कौतुकास्पद कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पिंपरी पोलिस ठाणे अंतर्गत रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करत असताना पोलिस अधिकारी आणि पोलीस नाईक जमीर तांबोळी पेट्रोलिंग करत असताना विठ्ठल नगर झोपडपट्टी नेहरूनगर येथे राहणारा सदाम सलार खा पठाण याच्या घरामध्ये इतिहास कालीन सोन्याची नाणी बेकायदेशीर रीत्या बाळगल्याची पक्की खबर मिळाली,त्यानुसार पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार पोलिस हवालदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत पोलीस नाईक जमीर तांबोळी यांनी माहिती घेऊन चौकशी केली असता सदाम पठाण यांच्या घरामध्ये सदरची इतिहासकालीन सोन्याची नाणी मिळून आली, त्यामध्ये 525 ग्रॅम कास्य धातूचा धातूचा तांब्या आणि त्याच्या आतमध्ये 2357 ग्राम वचनाची 216 सोन्याची इतिहासकालीन नाणी मिळाली, सखोल चौकशी केली असता झोपडपट्टीत राहणारा सदाम सलार याने त्याचे सासरे मुबारक शेख आणि मेहुना इरफान शेख राहणार पाथरी जिल्हा परभणी येथून कामानिमित्त पुणे येथे आले होते त्यांना पिंपरी येथे मजुरी काम करण्यासाठी त्याने लावले होते जेसीबी साह्याने खोद काम करून त्यामधील माती काढण्याचे काम करत होते त्या वेळी काम करत असताना त्यांना  मातीच्या ढिगार्‍यात सहा ते सात सोन्याची नाणी सापडली त्यांनी ती सादामकडे आणून दाखवली, ती सोन्याची नाणी पाहिल्यानंतर या तिघांनी मिळून खोदकामाच्या ठिकाणी जाऊन माती  चाळली असता त्यांना आणखीन एक तांब्यात सोन्याची नाणी सापडली त्यांनी ती घरी आणून ठेवले परंतु या तिघामध्ये सोन्याचे नाणे वाटून घेण्यावरून वाद सुरू झाले आणि यातूनच ही खबर बाहेर पसरली या घरांमध्ये इतिहासकालीन नाणी असल्याचे माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी वरिष्ठांना माहिती देऊन पोलिस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सदर इतिहासकालीन सोन्याची नाणी ताब्यात घेण्याचे आदेश दिले, यामध्ये प्राथमिक तपासात माननीय न्यायालय तसेच पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक पुणे यांना सदर चा अहवाल सादर करून सर्व सोन्याची नाणी पुरातत्व विभागाकडे जमा केले आहेत पुढील तपास सुरू आहे गुन्हे शाखा युनिट दोनच्या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News