महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारीचा सन्मान


महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारीचा सन्मान

महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रमाणिकपणे कर्तव्य बजावत आहे -विजय भालसिंग

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी पुष्पा सोनवणे यांचा जागातिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सन्मान केला. भालसिंग म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात महिला आपले कर्तृत्व सिध्द करीत असून, पोलीस दलात देखील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रमाणिकपणे कर्तव्य बजावत आहे. कोरोना महामारी असो किंवा कोणतीही बिकट परिस्थिती महिला पोलीस परिस्थितीपुढे न डगमगता आपले कर्तव्य बजावत आहे. पुष्पा सोनवणे यांनी देखील कोरोना काळात उत्कृष्टपणे कार्य केले. महिला पोलीसांचा सन्मान म्हणून त्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी पुष्पा सोनवणे यांचा जागातिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सन्मान केला. 

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News