कोरोनाचा कहर दौंड तालुक्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ही सुरूच, तीन दिवसात 51 पॉझिटिव्ह,


कोरोनाचा कहर दौंड तालुक्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ही सुरूच, तीन दिवसात 51 पॉझिटिव्ह,

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :दौंड शहरासह दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे,  मागील आठवड्यात 58 कोरोना रुग्ण होते परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तीनच दिवसात 51 पेशंट आल्याचे उपजिल्हा रुग्णालय दौंड अधीक्षक  संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, दौंड शहरासह तालुक्याची परिस्थिती कोरोना बाबतीत गंभीर होत चालली आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे सोमवार दिनांक 8 मार्च रोजी 78 लोकांची स्वाब घेण्यात आले होते त्यामध्ये 14 जण पॉझिटिव्ह आले होते, मंगळवार दिनांक 9 मार्च रोजी 72 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यामध्ये 19 जण पॉझिटिव्ह आले होते, तर आज बुधवार दिनांक 10 मार्च रोजी 83 लोकांची स्वाब घेण्यात आले होते त्यामध्ये सहा वर्षाच्या बालकासह 18 जण पॉझिटिव आल्याचे डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले, तीन दिवसातच 51 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाविषयी लोकांमध्ये गांभीर्य कमी झाल्याचे दिसून येत आहे, ही चिंतेची बाब असून भविष्यात खूप मोठे संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, विनाकारण फिरणारे, गर्दी करणारे यांच्यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा रुग्णांची संख्या वाढू शकते, सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा वरील आकडे पुढील येणारे संकट दर्शवत आहेत,कोरोना कमी झालेला नसून जनतेने याविषयी काळजी घेणे गरजेचे आहे प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News