कर्जत तालुका आजी माजी सैनिक फौंडेशनचा प्रथम वर्धापनदिन साजरा


कर्जत तालुका आजी माजी सैनिक फौंडेशनचा प्रथम वर्धापनदिन साजरा

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी :

कर्जत तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी गेल्या वर्षी दिनांक ८ मार्च २०२० रोजी स्थापन केलेल्या कर्जत तालुका आजी-माजी सैनिक सेवा फौंडेशनचा पहिला वर्धापन दिन दिनांक ८ मार्च २०२१ रोजी कर्जत येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून  साजरा करण्यात आला. या वेळी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांनी कर्जत तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना यावेळी शुभेच्छा दिल्या व कर्जत तालुक्याच्या सेवेसाठी आजी-माजी सैनिक संघटना नेहमी तत्पर राहील असे सांगितले व ते पुढे म्हणाले की, फौंडेशनच्या स्थापनेनंतर काही दिवसातच कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर ओढवले‌ होते. त्या काळात संघटनेच्या ३० ते ४० माजी सैनिकांनी व सुट्टीवर असलेल्या सैनिकांनी कर्जत तालुक्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना पासून बचाव करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचे मोठे कार्य केले होते. ही संघटना सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते.आता सध्या २ ऑक्टोबर २०२० पासून कर्जत शहरामध्ये सुरू असलेले स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानातंर्गत  सर्व सामाजिक संघटनांनी उभे केलेले श्रमदानातून स्वच्छतेच्या व वृक्षारोपणाच्या निरंतर कार्यामध्ये माजी सैनिक मोठ्या हिरीरीने सहभागी असून सध्या कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फौंडेशनचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा न करता कर्जत येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. तसेच ८ हा मार्च जागतिक महिला दिन असल्या कारणाने कर्जत शहराला स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या नगरपंचायतच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आजी माजी सैनिक सेवा फौंडेशन तर्फे  करण्यात आला. तसेच नुकतेच भारतीय सेनेतून सेवानिवृत्त होऊन आलेले सुनिल भवर व मनोहर लाळगे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, कर्जत तालुका आजी-माजी सैनिक सेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, सचिव सुनील साळुंके, खजिनदार श्रीकांत मारकड, सत्यवान शिंदे,रामदास फरांडे, अरुण माने,गंगाराम बनसोडे, जालिंदर जमदाडे, सतीश सुपेकर, सूर्यकांत निंबाळकर ,अनिल खाकाळ, राजू तोरडमल, शिवाजी तोरडमल, दत्तू बंडगर इ.माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच स्वच्छता अभियानात सहभागी असलेले सर्व सामाजिक संघटनांचे विजू काका तोरडमल, नितीन देशमुख,विशाल मेहत्रे,काकासाहेब काकडे,राजू बागवान, पारखे सर, अशोक नेवसे सर, दत्तात्रय गदादे सर,राजेंद्र पठाडे, संजय लाळगे, भाऊसाहेब तोरडमल इत्यादी स्वच्छता दूत व पत्रकार बांधव उपस्थित होते. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News