मखदुम व अलनूरच्यावतीने महिलांची मोफत नेत्र तपासणी


मखदुम व अलनूरच्यावतीने महिलांची मोफत नेत्र तपासणी

मखदुम सोसायटी व अलनूर आय केअर अ‍ॅण्ड ऑप्टीक्सच्या सहकार्याने मुकुंदनगर येथे महिलांसाठी मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

स्त्रीयांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे-तन्वीर चष्मावाला

     अहमदनगर -(प्रतिनिधी संजय सावंत) आपण आपले काम करत असतांना सामाजिक दायित्वही जपले पाहिजे. आज स्त्रीयांमध्ये आरोग्याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी मखदुम सोसायटीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे समाजातील वंचितांना आरोग्य सेवा मिळण्यास उपयोग होईल. विशेषत: वृद्ध महिलांना डोळ्यांच्या समस्य जाणवत असतात, त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसते. त्यामुळे अशा मोफत शिबीराच्या माध्यमातून स्त्रीयांना फायदा होणार असल्याचे, प्रतिपादन अलनूर आय केअर अ‍ॅण्ड ऑप्टीक्सचे संचालक तन्वीर चष्मावाला यांनी केले.

     मखदुम सोसायटीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त अलनूर आय केअर अ‍ॅण्ड ऑप्टीक्सच्या सहकार्याने मुकुंदनगर येथे महिलांसाठी मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आला. याप्रसंगी डॉ.प्रशांत पटारे, डॉ.स्मिता पटारे, शफकत सय्यद, रुग्णमित्र नादीर खान, शेख नुरलाल साहब, डॉ.शेख नवीद, तन्वीर चष्मावाला, आबीद दुलेखान आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी संस्थेच्यावतीने सर्वसामान्यांना उपयोग होईल, असे उपक्रम नियमित राबविला जातात. अशा उपक्रमासाठी अनेकांचे सहकार्य मिळत असल्याने प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले. शेवटी शफकत सय्यद यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News