यवत पोलीस स्टेशन हद्दीत सहजपूर येथे मोटार सायकल सह देशी विदेशी दारूचा 56 हजाराचा साठा जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई


यवत पोलीस स्टेशन हद्दीत सहजपूर येथे मोटार सायकल सह  देशी विदेशी दारूचा 56 हजाराचा साठा जप्त  : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

  सहजपुर रेल्वे गेट येथे होरो होंडा सीबीझेड सह दारू वाहतूक करणाऱ्या वाहनास मुद्देमाल सह ताब्यात घेऊन  ५६,२२०/- (छपन्न हजार दोनशे वीस) रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.

       पुणे जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांचे पथक दिनांक १०/०३/२०२१ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना  सदर पोलीस पथकास खबऱ्या मार्फत बातमी मिळालेने मौजे सहजपुर गावचे हददीत सहजपुर रेल्वे गेट, ता.दौंड जि.पुणे येथे सीबीझेड दुचाकी आडविली असता इसम नामे *प्रवीण खैरट रा.सहजपुर ता.दौंड जि.पुणे*  व त्याचा एक अनोळखी साथीदार हा पोलीसांना पाहून माल टाकून पळून गेला सदर दुचाकी सीबीझेड मोटार सायकल  नं.एमएच १२ जी सी १७७७ हिची व तेथे टाकलेल्या मालाची पोलीसांनी पाहणी केली असता दोन प्लास्टिक पोत्यामध्ये बेकायदा बिगरपरवाना *देशी विदेशी व गावठी हातभट्टी दारूचा साठा कि.रु. ११,२२०/- व  दुचाकी सह एकूण किं. ५६,२२०/- (छपन्न हजार दोनशे वीस)* रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे .

     सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून  मुद्देमाल हा यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. सदर अवैध दारूसाठा कोठे विक्रीसाठी नेणार होता? याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय खाडे हे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News