राष्ट्रवादी च्या चित्रपट व सांस्कृतिक विभागा तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान


राष्ट्रवादी च्या चित्रपट व सांस्कृतिक विभागा तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

पुणे प्रतिनिधी /सागरराज बोदगिरे:

जागतिक महिला दिन 8 मार्च 2021 यानिमित्त राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग पुणे शहर तर्फे पुणे शहरातील आपापल्या क्षेत्रातील नामवंत आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक महिलांचा सन्मान प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील, पुणे शहर अध्यक्ष गिरीश परदेशी, पुणे सरचिटणीस , संकेत शिंदे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.  आणि सांस्कृतिक विभागातर्फे या निमित्ताने समाजातल्या विविध क्षेत्रातल्या महिलांशी जोडण्याचा योग आला आणि या घरी जाऊन सत्कार करण्याच्या उपक्रमाला अनेकांनी दाद दिली आणि प्रत्यक्ष पुरस्कार्थींनी  सुद्धा या उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि सन्मानाचे स्वागत केले याप्रसंगी@) सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना लीला गांधी  १)अभिनेत्री जयमाला इनामदार(गाढवाचं लग्न , लफडा सदन, काशीराम कोतवाल, उंबरठा असे अनेक नाटक आणि सिनेमे त्यांनी केले) २)अभिनेत्री व लेखिका विभावरी देशपांडे( हरिश्चंद्राची फॅक्टरी, देऊळ बंद, नटरंग क्रिमिनल जस्टिस अशा अनेक चित्रपट आणि वेब सिरीज मधून त्यांनी भूमिका केल्या आहेत) ३)अभिनेत्री देविका दप्तरदार (नितळ नाळ नागरिक फॅन्सी चित्रपट खूप गाजले), ४)अभिनेत्री आयली घिया(हंटर या चित्रपटातून काम केले तसेच त्यांनी आपल्या नृत्याद्वारे अनेक पेशंट ना बरं केला आहे त्या आर्ट थेरपीज करतात व फिटनेस क्लासेस घेतात. तसेच केंद्र सरकारच्या  फिट इंडिया या पोर्टलच्या त्या ब्रँड अँबेसिडर आहेत) ५)नाट्यनिर्माती भाग्यश्री देसाई(त्यांचं ब्लाईंड गेम हे नाटक सध्या खूप गाजतंय) तसेच ६)सोनीया शिंदे राष्ट्रीय खेळाडू ,७)डॉक्टर केतकी भोसले मराठी भाषा तज्ञ ८)डॉक्टर वैशाली इंगळे सुप्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट ९)एडवोकेट सुनिता पागे इतिहास संशोधक १०)डॉक्टर मंजिरी भालेराव आणि सगळ्यांची ११)लाडकी लाठी वाली आजी, शांताबाई पवार १२) पंख या एनजीओच्या अध्यक्षा स्मिता आपटे जा गेली अनेक वर्ष विधी संघर्ष व्यसन लैंगिक प्रश्न याबद्दल युवकांचे कौन्सिलिंग करत आहेत त्यांच्या मानसिक शारीरिक आणि सामाजिक विकासासाठी काम करत आहे, या सर्वांचा  त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला आणि महिला दिनाचे औचित्य साधले गेले. या मोहिमेत अभिनेता राजेश मेहेंदळे, अभिनेत्री डिंपल चोपडे, अभिनेत्री स्मिता मधुकर, पार्थ खाडीलकर , अमित शिंदे, गणेश पांचाळ सामील होते !

जाहिरात
Search
विडिओ
Recent News