सराईत स्कॉर्पिओ चोरास अटक; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई


सराईत स्कॉर्पिओ चोरास अटक; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे:-श्रीगोंदा शहरातून एफ.जे.कार मल्टिसर्विसेस गॅरेज स्टेशन येथून स्कॉर्पिओ चोरी करणाऱ्या वाहन चोराला श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. महेंद्र बाजीराव महारनोर रा.वांगदरी ता.श्रीगोंदा याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 4,50,000/- रु. किंमतीची स्कॉर्पियो गाडी हस्तगत करण्यात आली आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे श्रीगोंदा शहरातून एक स्कॉर्पिओ गाडी चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करताना स्कॉर्पिओ गाडी चोरी करणारा महेंद्र बाजीराव महारनोर हा ढोकराई फाटा येथे एका चहाच्या दुकानासमोर असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली असता त्याठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीस आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या धाकवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास अटक केली.सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन,त्याच्यावर श्रीगोंदा, बेलवंडी, शिरूर, पुणे आदी ठिकाणी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    वरिष्ठ पोलीस मनोजकुमार पाटील, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर,पो.हे.कॉ.अंकुश ढवळे,पो.कॉ. प्रकाश मांडगे,पो.कॉ. दादा टाके,पो.कॉ किरण बोराडे, पो.कॉ.संजय काळे,पो.कॉ. गोकुळ इंगवले,पो.कॉ.योगेश सुपेकर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News