जागतिक महिला दिनानिमित्त एस एन आर उद्योग समूहाच्या वतीने महिलांचा सन्मान


जागतिक महिला दिनानिमित्त एस एन आर उद्योग समूहाच्या वतीने महिलांचा सन्मान

कर्जत मधे एस एन आर महिला लघु उद्योग करतोय महिलांना आत्मनिर्भर

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी :

कर्जत येथील राऊत हॉस्पिटल मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ऊद्योग समुहा मार्फत महिलांना सन्मानित करण्यात आले.  कुठलेच क्षेत्र असं नाही की तिथे महिलानी आपला ठसा उमटविला नाही परंतु कर्जत शहरासह तालुक्याचा विकास होत असताना या विकासात या कंपनीचा मोठा वाटा असेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य दक्षता समितीच्या सदस्यां मिराताई शिंदे यांनी व्यक्त केले. 

  जागतीक महिला दिनानिमित्त आपलं गाव आपला रोजगार अंतर्गत एस एन आर महिला लघु उद्योग समूहातील यशस्वी महिलांंचा सन्मान सोहळा आयोजित केला होता . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सौ. कुसुम धांडे या होत्या, राऊत हॉस्पिटल या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शहाजीनगर मधील मुक्ताई महिला भजनी मंडळातील महिलांच्या हस्ते या यशस्वी आत्मनिर्भर महिलांंचा सन्मान करण्यात आला,  यावेळी एस एन आर कंपनीच्या व्यवस्थापिका सुनीता हिरडे यांनी प्रास्ताविक करताना कंपनीची वाटचाल सांगताना नोव्हे २०२० मध्ये सुरू झाल्याचे सांगून या कंपनीत प्रथम फक्त तीन महिलांंच रोजगार मिळण्यासाठी आल्या होत्या. परंतु आज रोजी ३४२ महिलांना रोजगार आम्ही या उद्योग समूहाच्या माध्यमातून दिला असून कर्जत शहरातील या कुटुंबांना आधार मिळाला आहे. कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उद्योग समूहाच्या अध्यक्षा सायली नामदेव राऊत या  कंपनीचे  मार्केटिंगचे काम पुण्यातून करतात. या उद्योग समूहात तब्बल ७२ वर्षे वयाच्या सौ शाहिदा झारेकरी सहभागी असून यांनी सर्वात जास्त शिलाई काम केले अशी माहिती हिरडे यांनी दिली. त्यामुळे या कार्यक्रमात शहिदा झारेकरी, झुबेरा सय्यद, अश्विनी सराफ, मनिषा बनाते, शमा सय्यद, अंजुम शेख, रुपाली सोनवणे, गोदावरी राऊत आदी यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला. 

   यावेळी महाराष्ट्र राज्य दक्षता समितीच्या सदस्या मीरा शिंदे, सौ. भामाबाई राऊत, माजी सभापती सौ. सुवर्णाताई राऊत, सौ. रोहिणी ताई राऊत, डॉ. अश्विनी राऊत, श्रीगोंदा येथील भारती इंगवले, ज्योती शेळके, आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या. 

   यावेळी बोलताना नगरसेविका उषा राऊत म्हणाल्या की कर्जत शहरातील  महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही राऊत परिवार अहोरात्र प्रयत्न करू असे म्हटले. 

मनीषा गदादे यांनी भजनी मंडळाच्या यशाची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य दक्षता समितीच्या सदस्या मीरा शिंदे यांनी बोलताना ३४२ महिलांना एकत्र ठेवण्याचे काम या उद्योग समूहाने केले आहे. असे सांगून महिलांच्या त्यागाचा, कामाचा सन्मान आहे. असे शिंदे म्हणाल्या शेती असो चित्रकला असो वा इतर अनेक बाबीची निर्मिती महिलांनीच केलेली आहे. सध्या पुरुष प्रधानसंस्कृतीचा महिलांवर पगडा असल्याचे सांगताना सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा वापर महिला योग्य पद्धतीने करत नाहीत असे सांगताना जिद्द असेल तर मात्र महिला काहिही करू शकतात. त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊन चांगले काम केले पाहिजे असे आवाहन केले. आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी व आपला आत्मसन्मान जागविण्यासाठी आत्मविश्वासाने आणि कष्टाने काम केले पाहिजे यातून जगात आपले नाव कमाऊ शकता अशा शुभेच्छा दिल्या. शेवटी एस एन आर उद्योग समूहाच्या अध्यक्षा सायली नामदेव राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News