अवांछित मधून पश्चिम बंगालच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांवर पडणार...१९ मार्चपासून फक्त झीप्लेक्सवर


अवांछित मधून पश्चिम बंगालच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांवर पडणार...१९ मार्चपासून फक्त झीप्लेक्सवर

पुणे प्रतिनिधी / सागरराज बोदगिरे:

दोन वेगळी शहरं, दोन वेगळ्या संस्कृती, भाषा वेगळी, राहणीमान वेगळं पण यांना बांधून ठेवणारा दुवा म्हणजे अवांछित हा मराठी सिनेमा. दोन वेगळ्या संस्कृती, शहरं, भाषा असं का म्हंटलंय तर अवांछित या आगामी मराठी सिनेमाची कथा ही मराठी, दिग्दर्शक बंगाली, सिनेमातील कलाकार मराठी आणि बंगाली, सिनेमाचे लोकेशन पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील. थोडक्यात काय तर मराठी प्रेक्षकांना लवकरच पश्चिम बंगालच्या सौंदर्याची भुरळ पाडण्यासाठी अवांछित सिनेमा या महिन्यात प्रदर्शित होत आहे. 

निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा यांच्या फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत अवांछित मराठी सिनेमाचे दिग्दर्शन शुभो बासु नाग यांनी केले आहे. या सिनेमात मराठी कलाकारांसह बंगाली कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या मराठीतील हरहुन्नरी कलाकार किशोर कदम, मृणाल कुलकर्णी, अभय महाजन,  मृण्मयी गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण  आणि राजेश शिंदे हे या सिनेमाचा भाग आहेत. त्यांच्यासह बंगाली अभिनेते बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर या प्रमुख बंगाली कलाकारांचाही अभिनय मराठी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक,शुभो बासु नाग म्हणाले, बऱ्याच जणांना आश्चर्य वाटत असावं की मी बंगाली असून मी माझं दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल मराठी सिनेमातून उचलतोय. वयाच्या २०व्या वर्षी जेव्हा मी महाराष्ट्रात आलो तेव्हापासून महाराष्ट्राविषयी प्रेम वाटू लागलं आहे. मराठी भाषा मला आवडते आणि मी ती शिकतोय. आज मी जो काही आहे तो मुंबई शहरामुळे आणि मी याचं देणं लागतो म्हणून माझा पहिला सिनेमा हा मराठीत आहे. खरं तर पहिल्याच सिनेमात प्रतिभावान आणि प्रोफेशनल कलाकारांसोबत काम करायला मिळाले यातच मला खूप आनंद वाटतोय. सर्वांकडून मला सहकार्य मिळाले. एकंदरीत अनुभव खूप छान होता.  अवांछित सिनेमाच्या कथानकाची गरज म्हणून सिनेमाचे शूटिंग कलकत्त्यात झाले आहे. कलकत्त्यात मी लहानाचा मोठा झालो पण खऱ्या अर्थाने मी मुंबईत मोठा झालो, माणूस म्हणून घडत गेलो म्हणून अवांछित हा माझा सिनेमा दोन्ही शहरांसाठी माझ्याकडून एक ट्रीब्युट आहे.येत्या १९ मार्चला हा सिनेमा झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News