जिल्हा वाचनालयात महिला दिनानिमित्त महिला कर्मचार्यांनी वाचनालयास ग्रंथांची भेट दिली. याप्रसंगी उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, प्रा.ज्योती कुलकर्णी, सतीश झिकरे, दिलीप पांढरे, गणेश अष्टेकर, कु.पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, उमा देशपांडे, पुनम गायकवाड, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल. (छाया : सुरेश मैड)
नगर -प्रतिनिधी संजय सावंत
सुसंवाद, व्यक्त होणे, आपले मत निर्भिडपणे मांडणे ही आज काळाची गरज आहे. साहित्य क्षेत्रात मोजक्या स्त्रीयांनी आपल्या क्षेत्रात लोकाभिमुख साहित्य लिहिले आहे. स्त्रीचे कर्तुत्व, तिचे मत, प्रश्न, भाव-भावना या साहित्यातून समाजापुढे व्यक्त होऊन प्रकट करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत साहित्यिक कवी चंद्रकांत पालवे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा वाचनालयात महिला दिनानिमित्त महिला कर्मचार्यांनी वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथांची भेट वाचनालयास दिली. याप्रसंगी उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, प्रा.ज्योती कुलकर्णी, उद्योजक सतीश झिकरे, संचालक दिलीप पांढरे, गणेश अष्टेकर, सन्मानार्थी कर्मचारी कु.पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, उमा देशपांडे, पुनम गायकवाड, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल उपस्थित होेते.सतीश झिकरे यांनी मनोगततात स्त्री-पुरुष कुटूंबाच्या रथाची दोन चाके आहेत. एकमेकांच्या मतांचा आदर करुन प्रगती केली तर समाज व देशाची प्रगती होत असल्याने सुसंवाद आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रा.ज्योती कुलकर्ण यांनी देशाच्या, समाजाच्या व कुटूंबांच्या प्रगतीत स्त्रीचा वाटा अमुल्य असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही एकमेकांच्या मतांचा आदर केला तर भविष्य उज्वल असल्याचे सांगितले.
उपस्थित महिला संचालिका व सन्मानार्थी महिला कर्मचार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्तविक गणेश अष्टेकर यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पांढरे यांनी तर आभार अमोल इथापे यांनी मानले.