चौफुला सुपा रोडवर ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाश्यांच्या जीवावर..


चौफुला सुपा रोडवर ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाश्यांच्या जीवावर..

केडगाव प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील चौफुला मोरगाव रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अंतीम टप्प्यामध्ये असुन ब-याच ठिकाणी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या रस्तावरती देऊळगाव गाडा हद्दीत चोर ओढा नामक या ठिकाणी पुलाच्या भरावासाठी वापरण्यासाठी मोठ मोठे दगड मुरुम हे चक्क चालु रोडवरच टाकण्याचा प्रताप यांनी केला आहे. रात्रीच्या वेळी वाहनांना हे अपघाताचे निमंत्रणच आहे. मिळालेल्या माहीतीनुसार याठिकाणी अपघात ही झाले आहेत. तरी मोठे अनर्थ घडण्याची वाट पाहत आहे काय, कारण गेले 5 ते 6 दिवस झाले याठिकाणी हा राडा रोडा तसाच पडुन आहे, असे येथील नागरीकांनी बोलताना सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News