गरुड कॅन्सर हॉस्पिटल व अहमदनगर रोटरी मिडटाऊनतर्फे महिला दिनी महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर


गरुड कॅन्सर हॉस्पिटल व अहमदनगर रोटरी मिडटाऊनतर्फे महिला दिनी महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर

नगर (:प्रतिनिधी संजय सावंत) जागतिक महिला दिनानिमित्त दि.8 मार्च रोजी नगरमधील डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटल व अहमदनगर कॅन्सर सेंटर येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत हे शिबिर होणार असून यात रूग्णांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान करण्यात येणार आहे. शिबिराप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील तसेच उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कॅन्सर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.पद्मजा गरुड यांनी दिली.

शहरातील नगर-मनमाड रोडवरील डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटल 35 वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार करीत आहे. येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर केमोथेरपी, रेडियोथेरपी, मॅमोग्राफी तपासणी उपलब्ध आहेत. महिलांमधील स्तनाचा व गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण सध्या वाढत आहे. यादृष्टीने याठिकाणी अचूक निदान व प्रभावी उपचार करण्यात येतात. पॅपस्मीअर, कॉल्पॉस्कोपी, बायॉप्सी याव्दारे टेस्ट करून कॅन्सरचे निदान लवकर होते. रेडिएशनचे अत्याधुनिक अमेरिकन मशिनही येथे उपलब्ध आहे. डॉ. पद्मजा गरुड या शिबिरात महिलांना मार्गदर्शन व तपासणी करणार आहे. केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन आरोग्य विमा योजनेंर्तत रेडिओथेरपीसह कॅन्सरचे सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रेडिओथेरपी लाईटसह कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी हे सर्व उपचार मोफत केले जातात. गरूड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित कॅन्सर सर्जरी तज्ज्ञ डॉ.प्रकाश गरुड व रेडिओ थेरपी तज्ज्ञ डॉ.जगदीश शेजूळ पूर्णवेळ उपलब्ध आहेत. या शिबिराव्दारे डॉ.पद्मजा गरुड यांच्या अनुभवी उपचार व मार्गदर्शनाचा रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटलचे सी.ई.ओ.ऍड.अभय राजे, तसेच रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे, सेके्रटरी दिगंबर रोकडे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News