न्यायदान प्रक्रियेत गती व पारदर्शकता आनण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचे संजयशक्तीमान भारतीय न्यायपालिका क्रांती आंदोलन


न्यायदान प्रक्रियेत गती व पारदर्शकता आनण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचे संजयशक्तीमान भारतीय न्यायपालिका क्रांती आंदोलन

सत्य व्यक्तीला न्यायापासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही -अ‍ॅड. गवळी 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) 

 आधुनिक तंत्राचा वापर करुन न्यायदान प्रक्रियेत गती व पारदर्शकता आणून खर्‍या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन संघटनेच्या पुढाकाराने संजयशक्तीमान भारतीय न्यायपालिका क्रांती आंदोलन सुरु करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

भारतीय न्यायव्यवस्था हे तांत्रिक गोष्टींना महत्त्व देत असल्याने न्याय मागणार्‍या खर्‍या व्यक्तींना न्यायापासून वंचित रहावे लागत आहे. भारतातील मोठ्या प्रमाणात नागरिक असंघटित व अशिक्षित असल्याने त्यांना न्यायालयात दाद मागताना योग्य पुरावा सादर करता येत नाही. याचा गैरफायदा घेऊन ते सत्य असताना देखील त्यांच्या बाजूने न्याय होत नाही. न्यायदेवता उन्नतचेतना, तुफानी ऊर्जा व न्याय भज्ञाक तत्त्वापासून दूर आहे. आधुनिक तंत्राचा वापर करुन न्यायदान प्रक्रियेत गती व पारदर्शकता आणून खर्‍या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी संजयशक्तीमान भारतीय न्यायपालिका क्रांती आंदोलन जारी करण्यात आले आहे. महाभारतामध्ये संजय नावाच्या महात्म्याकडे दिव्यदृष्टी होती. न्याय संस्थेस दिव्यदृष्टी निर्माण होण्याच्या हेतूने वर्चुअल स्पॉट इन्स्पेक्शन (ताबा पडताळणी), वर्चुअल ओरल ईवीडन्स (तोंडी पुरावा) या तंत्राचा वापर केला जाणार आहे. तर हजारो लोकांच्या साक्षीने हा खर्‍या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. गुगल मॅपद्वारे सेटलाईच्या माध्यमातून शेत जमीन कोणाच्या ताब्यात आहे. हे देखील कळणार असल्याने खाजगी सावकारांना हद्दपार करण्यास याचा उपयोग होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

महसुल न्यायविक्री सर्रास सुरु असून, याला प्रतिबंध करण्यासाठी संजयशक्तीमान भारतीय न्यायपालिका क्रांती आंदोलन क्रांतीकारक ठरणार आहे. सत्य व्यक्तीला न्यायापासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही. न्यायदान प्रक्रियेत आधुनिक तंत्राच्या वापराची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News