दौंड तालुक्यातील खोरवडी येथे कामधेनू दत्तक ग्राम योजना शिबिराचे आयोजन


दौंड तालुक्यातील खोरवडी येथे कामधेनू दत्तक ग्राम योजना शिबिराचे आयोजन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील खोरवडी,वागदरा येथील श्री भैरवनाथ मंदिर येथे कामधेनू दत्तक ग्राम योजना अंतर्गत पशु पालकांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 बोरीबेल मार्फत जनावरांतील गोचीड निर्मूलन ,जंत निर्मूलन व वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मा. श्री.वीरधवल (बाबा) जगदाळे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.वीरधवल( बाबा) जगदाळे यांनी केले .यावेळी पशुपालकांना जंतनिर्मूलन,गोचीड निर्मूलन व वंध्यत्व निर्मूलन ची औषधांचे वाटप करण्यात आले तसेच मुरघास तयार करणे,निकृष्ट चारा सकस करणे या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य श्री. पोपट खोमणे, श्री भगवान जगताप, सरपंच सौ.शोभाताई दगडे उपसरपंच श्री. दीपक सोनवणे ग्रामपंचायत सदस्य सौ.मंगल दगडे, सौ.शितल सोनवणे, सौ.अमृता जाधव श्री.दत्तात्रेय जठार,श्री.अनिल गोसावी, श्री.राजेंद्र गुन्नर तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश जाधव, डॉ.शांतीलाल आटोळे,डॉ.ज्योती नाळे, डॉ. नवनाथ अडसूळ,डॉ.पोपट होळकर हे उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News