निमगाव वाघा येथे कृषीधन अ‍ॅग्रो दालनाचा शुभारंभ


निमगाव वाघा येथे कृषीधन अ‍ॅग्रो दालनाचा शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - निमगाव वाघा (ता. नगर) येथे शेतकर्‍यांसाठी लागणारे बी, बीयाणे, खते आदी शेती औषधांचा समावेश असलेल्या कृषीधन अ‍ॅग्रो या दालनाचा शुभारंभ वीर पत्नी कांताबाई शिवाजी फलके यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, बापू फलके, अनिल फलके, भाऊसाहेब फलके, बाळासाहेब कांडेकर, किशोर केरुळकर, जावेद शेख, शब्बीर शेख, झेंडे सर, युवराज भुसारे, ह.भ.प. गायकवाड महाराज, इंजी. तांदळे, अन्सार शेख, बापू फलके, गुड्डू शेख, दिलावर शेख, सुभाष जाधव, हिरामन केदार आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे म्हणाले की, गावतच शेतीसाठी आवश्यक असलेले बी, बीयाणे, खते आदी शेती औषधी मिळणार असल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे. पुर्वी ग्रामस्थांना शहरात जाऊन बी, बीयाणे व औषधे आनावी लागत होती. शेतकर्‍यांना बी, बीयाणे, खते आदी शेती औषधांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळून ही सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News