दौंड खानोटा गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन


दौंड खानोटा गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील खानोटा गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे,माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे,सदर घटनेची हकीकत अशी की खानोटा गावच्या पोलीस पाटील सौ उर्मिला उत्तम गायकवाड यांनी रात्री दहा वाजता दौंड पोलीस स्टेशनला खबर दिली की भीमा नदी पात्रात एक अनोळखी पुरुष जातीचे  मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला असून त्याचे अंदाजे वय तीस ते पस्तीस आहे त्याविषयी खबर दौंड पोलीस स्टेशनला दिलेले आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक लोंढे यांनी दिले आहे, मयताचे वर्णन पुढीलप्रमाणे -- उंची पाच फूट पाच इंच असून डोक्याचे केस बारीक आणि काळे आहेत शरीर तब्येत जाडसर असून अंगात पांढरा रंगाचा टी-शर्ट त्याच्या बाह्या काळ्या रंगाचे आहेत, त्याच्या कॉलर वर CITEMAN MADE IN INDIA असे इंग्रजी अक्षरात लिहिलेले आहे, अंगातील जीन्स निळ्या रंगाचे आहे, त्यावर  R AUTHENTIC 12 th revenger असे लिहलेले आहे, पांढऱ्या रंगाचे संडो बनियान आणि LUX VENUS कंपनीची निळ्या रंगाची अंडरवेअर आहे,हातात लालसर आणि पिवळ्या रंगाचा दोरा बांधलेला असून पायात काळा रंगाचा दोरा बांधलेला आहे, मयताचे हात आणि पाय बॉक्स पॅकिंग करण्याच्या प्लास्टिक चिकटपट्टीने बांधलेले असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे वर्णन पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार यांनी दिले आहे,सदर व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास दौंड पोलिस स्टेशनशी 02117/262333 संपर्क साधावा,माहिती देणारे व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News