विश्व हिंदू परिषदेतर्फे वैशंपायन यांचा सत्कार


विश्व हिंदू परिषदेतर्फे वैशंपायन यांचा सत्कार

प्रमोद वैशम्पायन यांचा पर्यावरणाचा उत्कृष्ट कार्याबद्दल नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,हरिभाऊ डोळसे,गौतम कराळे,श्रीकांत नांदापूरकर,निलेश चिपाडे,मुकुल गंधे,बाली जोशी, मिलिंद गंधे,चंद्रशेखर मुळे,अमोल कुलकर्णी,नरेंद्र सोनवणे,राजेंद्र चुंबळकर,अनिल राऊत,सुशांत पारनेरकर आदी.(छाया-अमोल भांबरकर)     

पर्यावरण विषयी वैशंपायन यांचे मोलाचे योगदान-गजेंद्र सोनवणे                                                                            नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) पर्यावरण प्रेमी इंजिनिअर प्रमोद वैशम्पायन हे गावोगावी भेट देऊन झाडे लावा,झाडे जगवा,पृथ्वी प्रदूषण मुक्त करा असा संदेश देत आहेत. वैशम्पायन यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण विषयी जनजागृती मोहीम राबवून मोलाचे योगदान दिले आहे.७२ वय असूनही उत्साहीपणे दररोज २० किलोमीटर सायकल प्रवास करून इंधन वाचवा हा संदेश देत आहेत.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी केले.                                        'ठाणे ते श्री क्षेत्र शेगाव' सायकल प्रवास करून पर्यावरण प्रेमी इंजिनिअर प्रमोद वैशम्पायन यांचे पर्यावरण विषयी जनजागृती मोहीम राबवित आहेत.पर्यावरणाचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमोद वैशम्पायन यांचा दिल्लीगेट येथील कुबेर गणेश मंदिरात नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच वैष्णपयं यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,कार्याध्यक्ष अँड जय भोसले,मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,बजरंगदलाचे गौतम कराळे,शहरसह मंत्री श्रीकांत नांदापूरकर,निलेश चिपाडे ,मुकुल गंधे,बाली जोशी ,उद्योजक मिलिंद गंधे,चंद्रशेखर मुळे,अमोल कुलकर्णी,नरेंद्र सोनवणे,राजेंद्र चुंबळकर,अनिल राऊत, सुशांत पारनेरकर आदी उपस्थित होते.                                                            

जाहिरात
Search
विडिओ
Recent News