कोरोना रुग्णांची संख्या मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पन्नाशी पार, दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात रुग्णांची संख्या जास्त


कोरोना रुग्णांची संख्या मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पन्नाशी पार, दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात रुग्णांची संख्या जास्त

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशी पार गेलेली आहे, शहर आणि ग्रामीण भागात मिळून 58 रुग्ण पाच दिवसात सापडले आहेत, ही चिंतेची बाब आहे दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये संख्या वाढत चालली आहे, जनतेने काळजी घेऊन आपले स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी केले आहे,दौंड तालुक्यातील खामगाव, यवत, खोर, केडगाव, नांनगाव, बोरिपारधी, गलांडवाडी, पाटस, भरतगाव, कासुर्डी, देलवडी, वाळकी, राहु या भागांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 1 मार्च रोजी 61 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यामध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, 2 मार्च रोजी 65 जनांचे स्वाब घेण्यात आले त्यामध्ये 16 पॉझिटिव्ह होते त्यामध्ये 9 शहर व 7 ग्रामीण, तीन मार्च रोजी 40 स्वाब  घेण्यात आले पैकी 6जण पॉझिटिव होते 3 शहर 3 ग्रामीण, चार मार्च रोजी 45 पैकी तीन जण पॉझिटिव्ह  तिन्ही रुग्ण शहर भागातील होते, पाच मार्च रोजी 60जणांचे स्वाब घेण्यात आले त्यापैकी 14 जण पॉझिटिव्ह पैकी शहर 5 व  ग्रामीण 9 जण पॉझिटिव आल्याचे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, दौंड शहरातील नागरिकांनी विना मास्क फिरू नये,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टर संग्राम डांगे यांनी केले आहे,पाटस गावातील चार ज्येष्ठ नागरिकांचा 15 दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाला असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी लग्नकार्यात गर्दी करु नये,अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करु नये आणि सेनी टायझरचा वापर करावा, मास्कचा वापर करावा आणि शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी केले आहे,दौंड शहरात विना मास्क फिरणारे, विनाकारण फिरणारे, वीना लायसन फिरणारे अशा सर्वांच्या वर कारवाई सुरू करण्यात आल्याचे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News