शिक्षणाची पहिली पायरी ही अंगणवाडी पासून सुरु होते. विद्यार्थ्यांना लहानपणातच शिस्त लावण्याचे काम अंगणवाडी मधूनच होत असते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई


शिक्षणाची पहिली पायरी ही अंगणवाडी पासून सुरु होते. विद्यार्थ्यांना लहानपणातच शिस्त लावण्याचे काम अंगणवाडी मधूनच होत असते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई

शिक्षणाची पहिली पायरी ही अंगणवाडी पासून सुरु होते. विद्यार्थ्यांना लहानपणातच शिस्त लावण्याचे काम अंगणवाडी मधूनच होत असते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई यांनी दिवटे येथे केले

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण जि.प.लाडजळगाव गटातील दिवटे या ठिकाणी सौ.हर्षदाताई काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर ८.३० लाख रु. किमतीच्या नवीन अंगणवाडी इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक नानासाहेब कणसे होते. सौ.संजीवनी व शहादेव जावळे तसेच सौ. कल्पना व सोपान कणसे या दांपत्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास देवराव दारकुंडे, उपसरपंच हरिभाऊ फाटे, किसन राठोड, लहू वडते, चंद्रकांत पोटभरे, रामेश्वर पोटभरे, भारत लांडे, भाऊसाहेब पोटभरे, नानाभाऊ चेमटे, दुर्गाजी रसाळ, सरपंच दत्तात्रय जाधव, उपसरपंच परमेश्वर जावळे, शिवाजी कणसे, पत्रकार रत्नाकर जावळे, विजय वंजारी आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ.काकडे म्हणाल्या की, जि.प.लाडजळगाव गटातील प्रत्येक गावात काही ना काही विकास काम देण्याचा माझा प्रयत्न असतो व तो मी पूर्ण करणारच. परंतु गेल्या वर्षी covid-१९ साथीमुळे जि.प.चा निधी कोविडसाठी देण्यात आला, त्यामुळे विकास कामे करता आली नाही. आताशी थोडा फार निधी येत आहे त्यामुळे या अंगणवाडीचे काम करतांनी गावकऱ्यांनी ते दर्जेदार करून द्यावे. ठेकेदारांशी सकारात्मक राहून आपले काम चांगले कसे होईल हे पहावे. भविष्यात याच इमारतीमध्ये तुमची लहान लहान मुले शिक्षणाची सुरुवात करणार आहेत. इथूनच त्यांना संस्कार, शिस्तीचे व प्रामाणिकतेचे धडे मिळतात. असेही सौ काकडे म्हणाल्या. 

शेकटेचे उपसरपंच हरिभाऊ फाटे म्हणाले की, लाडजळगाव गट हा सतत विकासापासून दुर्लक्षित राहिलेला आहे. परंतु जेव्हापासून सौ.काकडे या गटात निवडून आल्या तेव्हा काही गावातील लोकांना लाईट व डांबरी सडक त्यांच्या गावात पाहायला मिळाली. त्यांनी प्रत्येक गावात काही ना काही विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून विकास कामे केली आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे असे ते म्हणाले. यावेळी पत्रकार रत्नाकर जावळे, भाऊसाहेब पोटभरे, सुखदेव जाधव यांची भाषणे झाली. कार्यक्रमास ठेकेदार राजू फकीर, लक्ष्मण कणसे, रमेश जाधव, लहू जावळे, ज्ञानदेव जावळे, प्रमोद जावळे, माऊली कणसे, रमेश कणसे, दिगंबर कणसे, योगेश कणसे, बप्पासाहेब कणसे, बद्रीनाथ कणसे, विनोद कणसे, विठ्ठल कणसे, श्रीमंत जावळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील आढाव यांनी तर आभार अमोल जावळे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News