न्यूझीलंडमध्ये 8.1 तीव्रतेचा भूकंप, सरकारने दिला त्सुनामी अलर्ट


न्यूझीलंडमध्ये 8.1 तीव्रतेचा भूकंप, सरकारने दिला त्सुनामी अलर्ट

आज शुक्रवारी न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यांवर 8.1 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर आईसलँडजवळील केरमाडेक बेटावर भूकंपाचा धक्का बसला. यापूर्वी काही भागात 7.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. 

 पहिल्या भूकंपात उत्तरी आईसलँडपासून 900 किलोमीटर अंतरावर झटका बसला. हा धक्का 7.2 तीव्रतेचा होता. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने (नेमा) भूकंपानंतर त्सुनामीसंदर्भात अलर्ट जारी केला आहे.

 एजन्सीने व्हॉटारेई, ओपोटिकी, ग्रेट बॅरन आइलँडसह मटाटा ते तोलागा आइसलँडपर्यंतच्या परिसरांना संभाव्य धोका असल्याचे सांगितले आहे. बजावलेल्या इशारामध्ये असे म्हटले आहे की किनारपट्टीच्या भागांजवळ राहणाऱ्या लोकांनी त्वरित उंचीच्या मैदानाकडे जावे.

 भूकंपामुळे त्सुनामी आल्यावर मोठ्या नुकसानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. न्यूजीलँडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी इंस्टग्रामवर पोस्ट करत लोकांना किनारपट्टीच्या भागातून दूर राहण्यास सांगितले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, आशा आहे की, सर्व किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहतील.

  22 दिवसांपूर्वीही न्यूझीलँडच्या दक्षिणेत साउथ पॅसिफिकच्या न्यू केलेडोनिया आयलँडवर 7.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. ज्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजीमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. या परिसरामध्ये तीन फुटांच्या समुद्र लहरी निर्माण झाल्या होत्या. न्यूझीलंड, वानुआतू आणि दुसऱ्या पॅसिफिक बेटांवर भूकंप होण्याची शक्यता नेहमीच असते. हा परिसर रिंग ऑफ फायरच्या जवळ आहे.

त्सुनामी म्हणजे -जेव्हा समुद्रामध्ये जोरदार हालचाल होते तेव्हा त्यावरून खूप उंच लहरी उठू लागतात. या लाटा प्रचंड आवेगाने येतात. या उंच लहरींना त्सुनामी म्हणतात. वास्तविक त्सुनामी हा एक जपानी शब्द आहे जो सू आणि नामीपासून बनलेला असतो, सूचा अर्थ समुद्रकाठ आणि नामी म्हणजे लाटा.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News