सामाजिक संस्था एकता मंच लोणावळ्यात लवकरच सुरू करणार एनिमल सेलटर
मुंबई / लोणावळा : मुंबईतील सामाजिक संस्था एकता मंच आणि सोसायटी फॉर एनिमल सेफ्टी, इंडिया (एसएएस) या दोन स्वयंसेवी संस्थांनी लोणावळ्यात प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लोणावळ्यात (महाराष्ट्र) कौल व्हिला येथे 4 मार्च 2021 रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी अभिनेत्री आयशा जुल्का यांना प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी एक एनिमल सेफ्टी व्हॅन भेट म्हणून दिली. यावेळी मंचावर जैकी श्राफ, एकता मंच चे अध्यक्ष अजय कौल, सोसायटी फॉर एनिमल सेफ्टी इंडियाचे संस्थापक व अध्यक्ष नितेश खरे, उपाध्यक्ष अभिनेत्री आयशा जुल्का, चिल्ड्रन वेल्फेयर सेंटर हायस्कूलचे एक्टिव्हीटी चेयरमन प्रशांत काशिद यांच्यासह लोणावळ्यातील अनेक राजकीय नेते आणि अनेक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. वेगवेगळ्या सामजिक कार्यांमध्ये व्यस्त असलेल्या एकता मंच या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय कौल यांनी या प्रसंगी जॅकी श्रॉफ, आयशा जुल्का आणि नितेश खरे यांना धन्यवाद दिले आणि म्हटले की, जखमी, आजारी आणि भुकेलेल्या मुक्या जनावरांसाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे या प्राण्यांना संरक्षण आणि मदत मिळेल. यासाठीच आम्ही लोणावळ्यात लवकरच एनिमल सेलटर सुरू करणार आहोत.
उल्लेखनीय म्हणजे आयशा जुल्का आणि त्यांच्या पतीने लोणावळ्यात स्थानिक नगरपालिकेच्या मदतीने भटक्या कुत्र्यांसाठी 25 आकर्षक आणि स्वच्छ फीडर पॉइंट सुरू केले आहेत. यातच या कुत्र्यांना योग्य आणि नियमित भोजन व्यवस्था तसेच आपत्कालीन चिकित्सा सहायता मिळावी यासाठी जॅकी श्रॉफ यांनी आयशा जुल्का यांना ही एनिमल केयर व्हॅन गिफ्ट केली आहे. अजय कौल आणि काही प्राणीप्रेमींच्या साथीने गरजू आणि पाळीव प्राण्यांच्या उपचारांसाठी एक पशू रुग्णालय आणि पशू घर सुरू करण्याची इच्छा आयशा जुल्का यांनी यावेळी व्यक्त केली