पुणे सोलापूर हायवेवर दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी गजा आड, दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई


पुणे सोलापूर हायवेवर दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी गजा आड, दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

प्रतिनिधी --- पुणे सोलापूर हायवेवर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी दौंड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केली आहे, पुणे जिल्ह्यातील इंदापूर,भिगवण, दौंड, यवत, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत  या हद्दीत रस्त्यावरून मोटरसायकलवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून वेळप्रसंगी कोयत्याने वार करून  लूटमार करणाऱ्या टोळीला दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून बेड्या ठोकल्या यात आरोपी  सागर संदिपान शिंदे राहणार बिबेवाडी पुणे यास अटक करून त्याच्यासोबत रोड रॉबरी करणारे सराईत गुन्हेगार 1) शिवराज बाबासाहेब कोकरे राहणार बिबेवाडी पुणे 2) आकाश उद्धव कोपनर राहणार गोकुळ नगर लेन नंबर 6 पुणे 3) योगेश उर्फ पप्पू देवराव गोयकर राहणार कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या आरोपींची नावे निष्पन्न केली आहे. यातील काही आरोपी नुकतेच येरवडा कारागृहातून जामिनावर सुटलेले  होते. सदर टोळीने हायवेवर रोड रॉबरी चा धुमाकूळ घातला होता.

परंतु दौंड पोलीस स्टेशन पथकाने गोपनीय बातमीदारांना तसेच सीसीटीव्ही फुटेज याच्या मदतीने आरोपी पुणे येथे जाऊन बिबेवाडी झोपडपट्टी येथून अत्यंत शिताफीने पाठलाग करून अटक केला. अटक आरोपी कडून पुणे सोलापूर हायवे वर वेगवेगळ्या ठिकाणी अजून रॉबरी केल्याचे उघड केले आहे. त्यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनच्या एक तसेच भिगवण पोलिस स्टेशनची एक जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती  मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड  राहुल धस पोलीस निरीक्षक दौंड नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोलीस हवालदार बापू रोटे,पो हवा हुलगुंडे,पोलीस कॉन्स्टेबल विशाल जावळे, किरण चंदनशिवे, आदेश राऊत यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News