पोल्ट्रीसाठी आणलेले दहा फॅन चोरणारे दोन चोर दौंड पोलिसांच्या ताब्यात


पोल्ट्रीसाठी आणलेले दहा फॅन चोरणारे दोन चोर दौंड पोलिसांच्या ताब्यात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील सौ रतन लोंढे यांनी 21/02/21 दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की त्यांचे पोल्ट्रीसाठी आणलेले दहा सिलिंग फॅन चोरीला गेलेले आहेत, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या चोरीचा गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक वाघमारे पोलिस कॉन्स्टेबल डूके  आदेश राऊत, विशाल जावळे यांचे एक पथक तयार करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केले, त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल किरण यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की बोरबेल येथीलच विशाल अंकुश भंडलकर आणि गणेश राजू मोरे दोघे राहणार बोरीबेल यांनीच सदरची चोरी केल्याची माहिती मिळाली होती,त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले, सदर दोन्ही आरोपींनी अजून काय गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरू आहे,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार संतोष शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News