- कोरोना काळात कलाकारांचे मनोबल वाढवण्यासाठी एकांकिका स्पर्धा संपन्न


- कोरोना काळात कलाकारांचे मनोबल वाढवण्यासाठी एकांकिका स्पर्धा संपन्न

- कलावर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी ॲड. योगेश नाईक यांच्या वतीने एकांकिका स्पर्धेचे आयोजन

पुणे प्रतिनिधी/ सागरराज बोदगिरे:

 न्यू नटराज थिएटर्स अंतर्गत ॲड.योगेश दिलीप नाईक यांच्यावतीने रसवंती करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा  अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे  नुकतीच पार पडली. स्पर्धेला अमरावती, इचलकरंजी, पुणे, मुंबई, सांगली यांसह अनेक राज्यांतून स्पर्धक आणि प्रेक्षक वर्गाचा भरभरून प्रतिसाद लाभला. 

या दोन दिवसीय स्पर्धेत २१ संघांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी एकोणीस संघांनी केलेल्या सादरीकरणातून तीन विजेत्या संघाना सन्मानित करण्यात आले. यामध्ये आमचे आम्ही पुणे या संघाने सादर केलेल्या "अल्पविराम" या नाटकास सर्वोत्कृष्ट पारितोषिक जाहीर करण्यात आले.  तर, द्वितीय पारितोषिक रिफ्लेक्शन थिएटर पनवेल यांच्या "पँडल" या एकांकिकेने पटकवले. तृतीय पारितोषिकासाठी एस. एम प्रोडक्शन पुणे यांच्या बारा किमी. या एकांकिकेची निवड करण्यात आली. या तीनही विजेत्यांचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना स्पर्धेचे आयोजनकर्ते ॲड. योगेश दिलीप नाईक म्हणाले, सध्याचा हा काळ प्रत्येकासाठी कठीण आहे. आज प्रत्येकजण धीर धरून रोजच्या दिवसाला सामोरं जात आहे. हातावरचे पोट असलेल्या अनेक उद्योगधंद्यांसाठी रोजचा दिवस महत्त्वाचा आहे. या कठीण काळात कलाकार वर्गाला धीर देऊन प्रेरित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे होते.  यांसारख्या स्पर्धा घाबरलेल्या आणि विस्कळीत झालेल्या जनजीवनाला स्थिरस्थावर होण्यास मदत करतील, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. भविष्यात रसवंती करंडकचे हे व्यासपीठ अनेक नवोदित कलाकारांच्याकलागुणांना समृध्द करण्यासाठी खुले राहील. 

न्यू नटराज थिएटर्स संस्था चाळीस वर्षे जुनी असून या संस्थे  अंतर्गत यापूर्वी बालनाट्य आणि अनेक एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या या सक्षम व्यासपीठाने आज मराठी कलासृष्टित अग्रगण्य असलेले अभिनेते प्रवीण तरडे, आशुतोष वाडेकर, प्रसाद ओक, सिद्धेश्वर झाडबुके, अमेय वाघ यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांची नोंद घेतली आहे. ॲड. योगेश नाईक यांचे वडील दिलीप मोहन नाईक यांचा कलाक्षेत्राचा वारसा पुढे नेत ॲड.योगेश दिलीप नाईक यांनी रंगमंच रसिकांसाठी या स्पर्धेचे सूत्र पुढे चालवण्याचे ठरवले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ते कला क्षेत्राला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याची शाश्वती ॲड. नाईक यांनी दिली. 

या स्पर्धेला यशोधन गडकरी आणि विजयकुमार कदम हे परीक्षक पदी होते. तर सूत्रसंचालन अनिकेत जवळकर यांनी केले. यावेळी पारितोषिक समारंभाला मेघराज राजेभोसले, सचिन बामबुडे, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियांका शेंडगे-शिंदे, किरण कुमावत, ओमकार धनकवडे, विनोद खेडेकर यांची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी इव्हेंट पार्टनर म्हणून कलानिकेतन संस्था आणि कुसुमवंदन नाट्य संस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News