नियमबाह्य खाण उद्योगांविरुद्ध शेतकऱ्यांचे कुटुंबासह आत्मदहन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


नियमबाह्य खाण उद्योगांविरुद्ध शेतकऱ्यांचे कुटुंबासह आत्मदहन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी पुणे जिल्हा व वासुंदे येथील शेतकरी यांनी तहसीलदार दौंड, गटविकास अधिकारी दौंड, पोलीस स्टेशन दौंड, खनिकर्म विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांना वारंवार निवेदन देऊन अद्यापही नियमबाह्य बेकायदेशीर खाण उद्योगांवर कोणतीही कारवाई झाली नाही. प्रशासनास वारंवार लेखी तक्रारी, निवेदने देऊन प्रशासन जाणून-बुजून कार्यवाहीस टाळाटाळ करत आहेत. तरी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कारवाई व्हावी, कारवाई न झाल्यास बाधित शेतकरी कुटुंबासह आत्मदहन करण्यात येईल व यास  सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेे लेखी निवेदन दि. ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना काळ्या फिती बांधून संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे.

      गेंड्याची कातडी पांघरून सुस्त बघ्याची भूमिका घेत असलेल्या महसूल विभागाने त्वरित कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार रहावे, असे संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश जांबले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News