मुंबई येथील मासूम संस्थेतर्फे हिंद सेवा मंडळाच्या भाईसथ्था रात्र प्रशालेच्या गरजू मुलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किराणा वाटप करण्यात आला.याप्रसंगी भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी,हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,पेमराज सारडा महाविद्यालयाचे जुनिअर कॉलेजचे चेअरमन अँड अनंत फडणीस,मासूमचे अशोक चिंधे,शालेय समिती सदस्य विलास बडवे,प्राचार्य सुनील सुसरे आदी.(छाया -अमोल भांबरकर)
मासूम संस्थेचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच-डॉ.पारस कोठारी
नगर( प्रतिनिधी संजय सावंत) -भाईसथ्था रात्र प्रशालेतील विद्यार्थी दिवसा कष्ट करून रात्रीच्या शाळेत मेहनतीने व परिश्रमाने शिक्षण घेत आहेत.वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुसऱ्यांदा हे संकट समाजापुढे आले आहे.या महामारीने अनेकांचे कंबरडे मोडले आहेत.मनुष्याला जगणे कठीण झाले आहे.अश्या परिस्थितीत रात्र प्रशालेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये.म्हणून विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन मासूम संस्थेतर्फे किराणा वाटप करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरते.असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी यांनी केले.
मुंबई येथील मासूम संस्थेतर्फे हिंद सेवा मंडळाच्या भाईसथ्था रात्र प्रशालेच्या गरजू मुलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी किराणा वाटप करण्यात आला.तसेच सध्याची भीषण परिस्तिथी लक्षात घेऊन पूर्व काळजी म्हणून पुनश्च एकदा विद्यार्थ्यांसाठी किराणा वाटप करण्यात आला.व शाळेसाठी सॅनिटायझर देण्यात आले.याप्रसंगी भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्तिथीत हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,पेमराज सारडा महाविद्यालयाचे जुनिअर कॉलेजचे चेअरमन अँड अनंत फडणीस,मासूमचे अशोक चिंधे,शालेय समिती सदस्य विलास बडवे,प्राचार्य सुनील सुसरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी भाषणात मासूम संस्थेविषयी गौरवोद्गार काढून उपक्रमाचे कौतुक केले. प्राचार्य सुनील सुसरे प्रास्तविकत म्हणाले कि,मासूम संस्थे मार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सर्व परीक्षा सुरु असून त्याचे तात्काळ मूल्यांकन होऊन विद्यर्थ्यांना प्राप्त गुण पहावयास मिळत आहेत.याचे कामकाज शशिकांत गवस,जगदाळे सर,सूर्यवंशी सर हे करत आहेत.मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.देविदास खामकर,गजेंद्र गाडगीळ,महादेव राऊत,कैलास करांडे ,अशोक शिंदे ,शिवप्रसाद शिंदे,संदेश पिपाडा,श्री कुलकर्णी सर,मंगेश भुते,प्रशांत शिंदे,बाळू गोर्डे ,अनिरुद्ध देशमुख,अविनाश गवळी,मनोज कोंडेजकर,कैलास बालटे,सौ.साठे मॅडम,साताळकर मॅडम,दुराफे मॅडम आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.शरद पवार यांनी केले तर आभार प्रा.अमोल कदम यांनी मानले.