निमगाव वाघात एस.आर. फर्निचर दालनाचा शुभारंभ


निमगाव वाघात एस.आर. फर्निचर दालनाचा शुभारंभ

युवकांनी स्वत:चा व्यवसाय उभारुन इतरांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन द्याव्या -पै.नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - निमगाव वाघा (ता. नगर) येथे एस.आर. फर्निचर या भव्य दालनाचा शुभारंभ आदर्श माता ताराभाभी शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाबी शेख, पै. नाना डोंगरे, किरण जाधव,  उद्योजक चाँदभाई शेख, दिलावर शेख, नासीर शेख, अन्सार शेख, मोहसीन शेख, प्रियंका डोंगरे, गोकुळ जाधव, गुड्डू शेख, डॉ. विजय जाधव, भरत फलके, अनिल डोंगरे, पै.वली शेख, अली शेख, रफिक शेख, युनूस शेख, रामदास डोंगरे, रंगनाथ शिंदे, सुनिल जाधव आदी उपस्थित होते.

अन्सार शेख यांनी निमगाव वाघात एस.आर. फर्निचर या भव्य दालन सुरु केले आहे. उत्कृष्ट कारागिरांच्या माध्यमातून विविध प्रकारचे दर्जेदार व आकर्षक फर्निचर तयार करण्याचे काम सुरु असून, या निमित्ताने अनेक ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असल्याची भावना ग्रामपंचायत सदस्य डॉ. विजय जाधव यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे म्हणाले की, सध्या बेरोजगारीचे प्रमाण पाहता गावातील युवकांनी नोकरीच्या मागे न पळता स्वत:चा व्यवसाय उभारुन इतर युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्याची गरज आहे. शेख यांनी गावातच उभे केलेले फर्निचरचे दालन गावाच्या वैभवात भर पाडणारे असून, गावाच्या ठिकाणी उत्तम प्रकारचे फर्निचरचे साहित्य मिळत असल्याने ग्रामस्थांची देखील सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News