हडपसर येथे संत रविदास महाराज यांची 644 जयंती साजरी, कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान


हडपसर येथे संत रविदास महाराज यांची 644 जयंती साजरी, कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पुणे ससाणे नगर, हडपसर येथे सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी संत रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती साजरी करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच कोरोना योध्दांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे, सामाजिक कार्यकर्ते दिनकर तात्या सोनवणे, संजय सातव, शशिकलाताई वाघमारे, राजेश कांबळे, बंडूआप्पा सोनवणे, संजय शिंदे, महेश ससाणे, लाला सोनवणे, तुषार आबनावे, राजेंद्र ढवळे, हरीश शेलार, पत्रकार राकेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चित्ते, रविंद्रभाऊ खैरे, दत्ताभाऊ कदम, योगेश पवार, फैजास शेख, मैसूब पटेल, अजय न्हावले, हरिभाऊ कोडग, स्मिताताई गायकवाड, शोभाताई लगड आदि मान्यवर उपस्थित होते. संत रविदास सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ टिंटोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि मान्यवरांचा सन्मान केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News