सर्वसामान्य कुटुंबातील दिपाली विघे हिची जर्मनीला उच्च शिक्षणासाठी निवड!


सर्वसामान्य कुटुंबातील दिपाली विघे हिची जर्मनीला उच्च शिक्षणासाठी निवड!

शिर्डी,राजेंद्र दूनबळे( प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील सर्वसामान्य कुटुंबातील कन्येची उच्च शिक्षणासाठी जर्मनीला निवड झाली आहे, सावळीविहीर बुद्रुक येथील दिपाली रमेश विघे हिचे समाजशास्त्र या विषयात पीएचडी साठी  फ्रॅंकफूट ,जर्मनी येथील विद्यापीठाने तिची निवड केली असून ती लवकरच विमानाने जर्मनीला  रवाना होणार आहे, तिचे या निवडीबद्दल सावळीविहीर व परिसरातून, विविध स्तरातून अभिनंदन होत आहे, तिचा सन्मानही करण्यात आला आहे,

 दिपाली रमेश विघे हिचे प्राथमिक शिक्षण सावळीविहीर बुद्रुक येथील जि. प. प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत झाले, त्यानंतर येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये तिने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर अकरावी-बारावी विज्ञान शाखेमध्ये तिने श्री साईबाबा ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तेथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले व त्यानंतर कै, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव, ता, वैजापुर येथे तिने आपले बीएससी ऍग्री पूर्ण केली, सर्व ठिकाणी ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत गेली ,त्यानंतर मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेंट स्टुडन्टंस यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथे 2011 ते 2013 या वर्षात शिक्षण घेऊन नंतर ती इकोफॉर्मस इंडिया लिमिटेड ,यवतमाळ येथे प्रकल्प अधिकारी म्हणून एका चांगल्या नोकरीला होती ,नंतर दिपाली रमेश विघे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे ही जुलै 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले, त्यानंतर तेथेच ती सहाय्यक प्रकल्प संचालक ही या वरिष्ठ पदावर नोकरीस होती, पुणे येथे जात पडताळणी विभागातही  अधिकारी म्हणून  तिने नोकरी केली ,त्यानंतर मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये तिने मास्टर ऑफ फिलोसोफी इंन सोशल सांयन्स यामध्येही डिग्री संपादन केली, नोकरी करत असताना तिने आपले उच्च शिक्षण ही सुरू ठेवले ,दिपालीने आतापर्यंत अनेक प्रबंध लिहिले असून एक  संशोधन प्रबंध तीचा प्रकाशित झाला आहे, त्याचप्रमाणे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये तिने सहा प्रबंध सादर केलेले असून त्यामध्ये भटक्या-विमुक्तांच्या जगण्याचा प्रश्न ,भटक्या विमुक्तांचे मानवाधिकार ,भटक्या ,विमुक्तांचे प्रतिनिधित्वाचे प्रश्न, गरिबी व बालकामगार या वरील विषयावर तिने हे प्रबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये सादर केलेले आहेत, असे विविध शिक्षण संपादन करत प्राविण्य मिळवले आहे, सावळीविहीर बुद्रुक सारख्या छोट्या खेड्यात जन्मलेली व सर्वसामान्य कुटुंबात राहिलेली व जिल्हा परिषद ,प्राथमिक शाळेत व रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी माध्यमात शिक्षण घेणारी दिपाली आज उच्च विभूषित शिक्षण नोकरी करून संपादन करत आली आहे व तिची आणखी शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा व जिद्द मोठे कौतुकास्पद असून तिची समाजशास्त्र या विषयासाठी पीएचडी मिळवण्याची इच्छा होती व तिची निवडही झाली आहे  ,ती जर्मनीला उच्च शिक्षणाला जात आहे, तिला या उच्च शिक्षणासाठी नवी दिल्लीतील सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयामार्फत नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशिप ही मंजूर झाली आहे, त्यामुळे दीपालीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News