अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी 13 मार्च रेल्वे रोकोच्या जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन


अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी   13 मार्च रेल्वे रोकोच्या जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

विविध स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकास निवेदन देऊन पाठिंबा द्यावा

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी मागील एक दशकापासून अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना प्रयत्नशील आहे. शहराच्या सर्वांगीन विकासासाठी महत्त्वाची बनलेली ही रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व माजी खासदार दिलीप गांधी प्रयत्नशील असून, त्यांचे देखील प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारसह रेल्वे विभागाचे लक्ष वेधून ही रेल्वे सेवा तातडीने सुरु होण्यासाठी संघटनेच्या वतीने शनिवार दि.13 मार्च रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून, यामध्ये अनेक स्वयंसेवी संघटना सहभागी होत आहे. या जन आंदोलनात शहरातील विविध स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविण्यासाठी अहमदनगर रेल्वे स्थानक येथे स्टेशन मॅनेजर यांना अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मागणीचे व रेल्वे रोकोला पाठिंबा दर्शविणारे निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही रेल्वे सेवा नगरकरांच्या जनरेट्यामुळे सुरु होणार असल्याचा विश्‍वास संघटनेच्या वतीने हरजितसिंह वधवा यांनी व्यक्त केला आहे.  

अहमदनगर-पुणे रस्त्यावर सातत्याने वाढत असलेल्या वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यामुळे पुणे-नगर प्रवासाचा वेळ वाढून तो चार तासांहून अधिक झाला आहे. सध्या हा मार्ग चौपदरी आहे, मात्र तो कमी पडत आहे. त्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच अहमदनगर-पुणे थेट रेल्वे सेवा सुरू केल्यास इंधनाची बचत तर होणार आहेच, पण विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मागील 11 वर्षांपासून तत्कालीन रेल मंत्री मा. सुरेश प्रभू, मागील टर्म मध्ये मा.ना. पियुष गोयल, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, सोलापूर विभागाचे रेल्वे मॅनेजर अशा अनेक लोकांनी आश्‍वासन दिले, त्यात विद्युतीकरण संपल्यावर, ततपश्‍चात कॉडलाईनचे काम झाल्यावर आणि मागील वर्षी दौंड येथे बाय पास येथे रेल्वे स्थानक झाल्यावर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याचे अश्‍वशान देण्यात आले होते. मात्र हे आश्‍वासन पाळले गेले नसल्याने जन आंदोलनाच्या माध्यमातून अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवेचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने पुढाकार घेतलेला असून, रेल्वे रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरा देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हर दिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाउंडेशन, फिनिक्स फाउंडेशन उतरले आहेत. शहरातील इतर सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष व नगरकरांना या जन आंदोलनात सहभागी होण्यासाठी पाठिंब्याचे पत्र रेल्वे स्थानकावर देण्याचे सांगण्यात आले आहे. या आंदोलनासाठी हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, विपुल शहा, संजय सपकाळ, अशोक कानडे, अजय दिघे, धनेश कोठारी, संजय वाळूंज आदी प्रवासी संघटनेचे सदस्य प्रयत्नशील आहेत.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News