स्वच्छ कर्जत अभियानांतर्गत कर्जत ते पैठण पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल दिंडीचे शेवगाव शहरात आगमन


स्वच्छ कर्जत अभियानांतर्गत कर्जत ते पैठण पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल दिंडीचे शेवगाव शहरात आगमन

- शेवगाव कर्जत स्वच्छता अभियानाचे पोलिस ठाण्यात स्वागत करताना उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील आदी.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

 स्वच्छ कर्जत अभियानांतर्गत कर्जत ते पैठण पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल दिंडीचे आज रविवारी ( ता. २८ ) सकाळी अकरा वाजता शेवगाव शहरात आगमन झाले. या वेळी रोटरी क्लबसह विविध सामाजिक संस्था व नगर परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी या दिंडीचे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक ते ब्राह्मण गल्ली येथे कर्जतकरांनी स्वच्छता अभियान राबवून शेवगावकरांना स्वच्छतेची प्रेरणा दिली.

कर्जत नगर पंचायतचे  मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत स्वच्छता अभियान सायकल दिंडी  कर्जत - धामणगाव - पाथर्डी - अमरापूर मार्गे शेवगाव येथे आज रविवारी ( दि. २८ ) सकाळी ११ वाजता येथील संत गाडगेबाबा चौकात पोचली. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ८ वर्षाच्या मुलापासून ते ८३ वर्षाच्या वयोवृद्धापर्यंतचे नागरिक सहभागी झाले होते. सर्वसामान्य नागरिक, शिक्षक, व्यापारी, अधिकारी - कर्मचारी, पत्रकार, सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनीधी या सायकल दिंडीत सहभागी होते.

या वेळी  रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा,  रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ,  भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, डॉ. गणेश चेके,  प्राचार्य दिलीप फलके, भागनाथ काटे, प्रविण लाहोटी, डॉ. पुरूषोत्तम बिहाणी, स्नेहलता लबडे, बाळासाहेब डाके, प्रा. काकासाहेब लांडे, प्रा. अण्णासाहेब दिघे,  उचल फाऊंडेशनचे सचिन खेडेकर, स्वाती ढवळे आदींनी या दिंडीचे स्वागत केले.

संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बाजार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कर्जत स्वच्छता अभियान सायकल दिंडीतील सायकलस्वारांनी अभिवादन केले.  या वेळी शेवगाव शहरातील स्वच्छता कर्मचा-यांनीही कर्जतकरांचे स्वागत केले.  त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ब्राह्मण गल्ली परिसराची स्वच्छता कर्जतकरांनी केली.  सामाजिक कार्यकर्ते खंडू बुलबुले यांनी कर्जतच्या दिंडीतील सायकलस्वारांच्या भोजनाची व्यवस्था केली.

सामाजिक संघटनांचा लोकसहभाग घेऊन कर्जत स्वच्छता अभियानाने कर्जत ( जि. अहमदनगर ) शहरात महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२० पासून रोज सकाळी दोन तास असे  १५० दिवस स्वच्छता अभियान राबिल्यानंतर  कर्जत ते पैठण काढली. त्या आधी कर्जत ते पंढरपूर अशी एक दिवसाची सायकल दिंडी काढली होती. स्वच्छता अभियानाबरोबर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम  आम्ही राबविला. प्रदुषण मुक्तीसाठी सायकल पर्यावरण पुरक असल्याने स्वच्छतेबरोबर पर्यावरण जनजागृतीसाठी ही सायकल दिंडी काढली, असे कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी  गोविंद जाधव यांनी या वेळी  सांगीतले.

शेवगाव पोलिस ठाण्यात  उपविभागीय पोलिस अधिक्षक सुदर्शन मुंडे व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी या सायकल दिंडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.  त्यानंतर सायकल दिंडी पैठणकडे रवाना झाली. कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, तात्या क्षीरसागर, भीमा जंगम, नितीन देशमुख, विजय तोरडमल, अभय बोरा, भाऊसाहेब रानमाळ, राहुल नवले, तानाजी पाटील, सत्यजित मच्छीन्द्र, अशोक नेवसे, फारूक बेग, अण्णा म्हस्के, नंदकुमार लांगोरे, सुनील भोसले, दत्तात्रय कोपनर, गिरीश गुंड, निरंजन काळे, सचिन धांडे, साळुंके मेजर, मारकड मेजर, पत्रकार मुन्ना पठाण, विशाल तोरडमल, शेरखान पठाण, दीपक माने, भिसे सर, प्रवीण गटकळ, दादासाहेब पारखे, दत्तात्रय गदादे, खुश बोरा, वेदांत कदम, मयूर नेवसे, पत्रकार आशिष बोरा आदी सह अनेक जण सहभागी झाले होते.

चौकट - १) शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिक्षक सुदर्शन मुंडे हे कर्जतला कार्यरत होते तेव्हा रोज सकाळी सायकल फेरी मारायचे. त्यांची प्रेरणा कर्जत स्वच्छता अभियानाला मिळाल्याने कर्जत ते पंढरपूर एक दिवसीय व कर्जत ते पैठण दोन दिवसीय अशा दिंडी काढण्याची  माहिती पत्रकार आशिष बोरा व मुन्ना पठाण यांनी दिली.

२) कर्जत स्वच्छता अभियान सायकल दिंडीने शेवगावकरांना प्रेरणा मिळाली. शहरातील रोटरी क्लब व इतर सामाजिक संघटनांचा सहभाग घेऊन शेवगाव शहरातही स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबवण्यात येईल . - अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी , शेवगाव नगर परिषद.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News