पुणे हडपसर येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले ₹२० फि घेणारा दवाखाना


पुणे हडपसर येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले ₹२० फि घेणारा दवाखाना

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

स्मितसेवा फाउंडेशन व सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर ससाणे नगर येथे पुण्यातील पहिला प्रोजेक्ट 20 रुपयांमध्ये दवाखाना( तपासणी फी 20 रुपये) Polyclinic व Day Care चा उद्घाटन समारंभ 26 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडला. करोनाच्या या काळामध्ये बहुतेक लोकांची आर्थिक स्थिती चे गणित बिघडले आहे.. त्यासाठी सर्व स्तरातील लोकांना या दवाखान्याचा फायदा होईल, या भावनेने या दवाखाना काढण्याचे ठरले. या दवाखान्याचा उद्देश्य प्राथमिक सुविधा लवकर मिळावी, सर्व प्रकारच्या आजारांवर मार्गदर्शन, मोफत वेगवेगळे कॅम्प नियोजन, शासकीय व निमशासकीय सर्व योजनांची माहिती, मोफत शस्त्रक्रिया मार्गदर्शन,  शस्त्रक्रियेला आर्थिक मदत मार्गदर्शन, बाल रोगाची सर्व माहिती, स्त्री रोग व प्रसूतीपूर्व तपासणी, हृदयविकार, मेंदूविकार, श्वसनाचे विकार, मधुमेह सल्ला व तपासणी अशा प्रकारचे सर्व फायदे येथे मिळतील. हडपसर परिसरातील  ससाणे नगर भागात पुणे शहरातील पहिला रू २० दवाखाना सामाजिक कार्यकर्त्या *स्मितसेवा फाउंडेशन अध्यक्षा सौ स्मिता तुषार गायकवाड* व सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने सदर दवाखान्याचा शुभारंभ भाजपा नगरसेवक आबा तुपेे,  डॉ उज्वलाताई हाके ( प्रदेशाध्यक्ष भटक्या विमुक्त  भाजपा), डॉ मंगेश वाघ (हडपसर मेडिकल असो),  डॉ बाळासाहेब हरपळे (सदस्य - मेडिकल कौन्सिल आफ इंडिया(A), श्रीमती शशिकला ताई वाघमारे, श्री बाळासाहेब हरपळे, सौ प्रीती व्हिक्टर, श्री प्रमोद सातव, श्री संतोष शिंदे, श्री अभिजीत बोराटे, श्री गणेश वाघ,  श्री निखिल शिंदे, श्री राजेश कांबळे, श्री संजय शिंदे, श्री विजय नायर, श्री अमोल दुगाणे, श्री महेश पवार, विकास गदादे, श्री गणेश वाडकर, श्री आकाश डांगमाळी, श्री महेश ससाणे, श्री अमित गायकवाड ,  डॉ सागर शिंदे,  श्री महेश ससाणे, श्री संजय पारिख,  श्री अशोक सोरगविकर, श्री रवींद्र चव्हाण, श्री दिगंबर माने, श्री गणेश वाडकर, श्री गणेश काळे, डॉ सागर शिंदे, श्री दिलीप मोरे, श्री रौफ शेख , श्री बाळासाहेब हिंगणे, सौ मिना थोरात , सौ सुशीला चौरे, सौ अपर्णा बाजारमठ, सौ अनिता हिंगणे, सौ दिपाली कवडे, सौ सविता घुले, सौ संध्या एडके, सौ आरती यादव, श्रीमती अश्विनी सुपेकर, सौ अर्चना टिळेकर, सौ वाडकर काकू, सौ संगीता पाटील,  सौ शशिकला कांबळे, सौ माधुरी जगताप, सौ सुनीता सैदाणे, सौ कविता पाटील, ताम्हाणे ताई, सोनल जैन, धवल windscape मेंबर्स, व सर्व मित्र परिवार, पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी दवाखाना टिम चे डॉ निखिल शेंडकर, सौ अर्चना शेळके  पाटील,  डॉ लक्ष्मण देवकाते, डॉ सोनाली रोहित बोरकर,  डॉ सार्थक बेंगाळ, डॉ नम्रता शिंदे, डॉ प्रविण मिसाळ,  डॉ प्रियंका कोटवाल, डॉ शरद कारंडे आदि डॉक्टर्स उपस्थित होते. स्वतःसाठी तर सगळेच काम करतात पण इतरांसाठी काम करण्यामध्ये, त्यांना आनंद देण्यामध्ये जी मजा, आनंद आहे ना तो कशातच नाहीये अशा भावना सौ स्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केल्या. प्रत्येकाने सामाजिक कार्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.

या कार्यक्रमाचे संयोजन  सौ स्मिता गायकवाड, श्री तुषार गायकवाड,  श्री  रोहित बोरकर,  सौ दर्शना डाके, सौ आशा भुमकर, श्री सागर पवार, विठ्ठल बोरकर, कु. पूजा मोरे, श्री अमोल भुजबळ, सौ शर्मिला डांगमाळी यांनी केले.  

दवाखाना  हेल्पलाइन संपर्क - 

02026125144

7385 434 108

8286112112

www.ahilyahealthhelpline.org

जाहिरात
Search
विडिओ
Recent News