जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य फडके, उपाध्यक्षपदी शिवाजी भुसारी यांची सर्वांनुमते निवड


जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य फडके, उपाध्यक्षपदी शिवाजी भुसारी यांची सर्वांनुमते निवड

शेवगांव शहर, सर्कल जेसीबी  मालक संघटना कार्यकारणी जाहीर

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव शहर, सर्कल  तालुका जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य फडके, उपाध्यक्षपदी शिवाजी भुसारी , सचिव पदी रमेश डमाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेवगाव तालुका जेसीबी मालक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे उपाध्यक्ष राजेश फटांगरे, सचिव अनिल मेरड, रामजी शिदोरे, देविदास फाटके, राजेंद्र फाटके उपस्थित होते.

शेवगाव शहर, सर्कल जेसीबी मालक संघटनेची बैठक नुकतीच गोपीनाथ मुंडे चौकातील दत्तमंदिर सभामंडपात पार पडली. यावेळी बोलताना बाळासाहेब जाधव म्हणाले की, दिवसेंदिवस डिझेलच्या भावात वाढ होत असल्याने तसेच स्पेअर पार्टचे भाव व देखभाल खर्च वाढला असल्याने जेसीबी मालक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे भाव वाढ होणे गरजेचे आहे.आहे त्या दरामध्ये देखभाल खर्च भागत नसल्याने जेसीबीचे कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न जेसीबी मालकासमोर पडला आहे. 

 विहीरीचे खोदकाम पूर्वीच झालेले असताना महसूल प्रशासन विहीरीचे खरीप उचलण्यास अडथळा आणत आहे. विहीरीचे उत्खनन यापूर्वी झालेले असताना विहीरीचे खरीपाचे वाहतूक करतांना वाहणे पकडल्यास अवैध उत्खनन म्हणून चुकीची कारवाई करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विहीरीचे खरीप,मुरुम वाहतुकीस विनाअट परवानगी द्यावी. व डिझेल दरवाढीमुळे प्रती तास भाव वाढ करण्यासाठी विचारविनिमय करून आज  सोमवार दि. १ मार्च पासुन भाव वाढ करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी शेवगाव शहर, सर्कलची कार्यकारणी बाळासाहेब जाधव यांनी जाहीर केली.

अध्यक्षपदी अजिंक्य फडके, उपाध्यक्ष पदी शिवाजी भुसारी, सचिव पदी रमेश डमाळ, कार्याध्यक्ष पदी गणेश शिंदे, खजिनदार पदी मिलींद जगताप, सल्लागार पदी संभाजी बोडखे तर सदस्य पदी नाना कर्डिले, शौकत पटेल, अशोक जायगुडे, ऋषिकेश देवढे, ऋषिकेश  काठवते, चैतन्य काळे, सागर कुसळकर, प्रमोद काकडे, एकनाथ डोंगरे, नवनाथ मरकड, योगेश काकडे, विकास कबाडी, आकाश कोरडे, कोंडीराम गरड, समीर शेख, राजू भापकर, इंनुस सय्यद, राजेंद्र पठाडे, कचरु शिंगाडे, शंकर नाचन, मनोज पायघन यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी शेवगांव शहर, अमरापूर, वडूले, आव्हाणे, आखेगांव, बोधेगांव येथील जेसीबी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News