भोंदू बाबाच्या रॅकेटमधून सावकाराच्या घशात गेलेली व खोट्या कागदपत्राद्वारे विक्री झालेल्या जमीनीवर काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा... सावकाराच्या शोषणाने पिडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार


भोंदू बाबाच्या रॅकेटमधून सावकाराच्या घशात गेलेली व खोट्या कागदपत्राद्वारे विक्री झालेल्या जमीनीवर   काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा... सावकाराच्या शोषणाने पिडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - गुप्त धनासाठी फसवणूक करणारा भोंदू बाबा व त्याचे साथीदारांनी फिर्यादी बाळू लक्ष्मण पवार यांची जमीन खाजगी सावकाराच्या खश्यात टाकली. सदर सावकाराने या जमीनीचा खोट्या कागदपत्राद्वारे ताब्याशिवाय खरेदी घेऊन विक्री केली असताना, पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने सावकाराच्या शोषणाने पिडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडेवाडी (ता. कर्जत) येथे शनिवार दि.6 मार्च रोजी काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

बाळू लक्ष्मण पवार यांची भांडेवाडी (ता. कर्जत) येथे 186 गट नं. मध्ये 1 हेक्टर 99 आर शेत जमीन आहे. मध्यप्रदेश येथील भोंदू बाबा अब्दुल समी महाराज व त्याचे दोन साथीदार भारत मुरारी दिंडोरे, विक्रम जयसिंग पवार (दोन्ही रा. दौंड) यांनी बाळू पवार यांना तुमच्या शेतातून गुप्त धन काढून देण्याचे अमिष दाखविले. त्यापोटी पैश्याची मागणी केली. यामधील आरोपी विक्रम पवार यांनी त्याचे मेव्हणे सावकारकडून रक्कम देखील मिळवून दिली. सावकाराने रकमेपोटी ताब्याशिवाय सदर जमीन गहाण ठेऊन जमीन व पैसे बळकावण्याच्या या रॅकेटमध्ये पवार यांना अडकविण्यात आले. अनेक वर्ष होऊन देखील गुप्त धन मिळत नसल्याने बाळू पवार यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले. बाळू पवार यांनी 11 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन कर्जत पोलीस स्टेशनला बोंदू बाबांसह इतर त्याच्या साथीदारावर कोट्यावधी रुपयाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. मात्र खाजगी सावकाराने पवार यांची जमीन नोटरीद्वारे खरेदीखत करुन घेतली. सदर जमीन पवार कुटुंबीयांच्या ताब्यात असून, ही जमीन ते कसतात. दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी सदरील खाजगी सावकाराने पवार यांच्या शेजारी असणार्‍याला बनावट कागदपत्राद्वारे कमी किंमतीत विकली. तर खोट्या कागदपत्राद्वारे जागा विकत घेणारे व्यक्ती जागा बळकावण्यासाठी पवार कुटुंबीयांना धमकाविण्याचे प्रकार सुरु केले आहे. सदर खरेदीखतावर संपत लक्ष्मण पवार (भाऊ), पार्वती रायचंद शिंदे, सरस्वती दत्तू क्षीरसागर (दोन्ही बहीण) यांच्या सह्या देखील नसल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला आहे. सावकाराच्या शोषणातून न्याय मिळण्यासाठी पवार कुटुंबीयांनी पीपल्स हेल्पलाईनचे अ‍ॅड. कारभारी गवळी व अंधश्रध्दा निर्मुलनचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. बाबा आरगडे यांच्याकडे कैफियत मांडली. या सावकारी शोषणाचा बिमोड करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, संघटनेच्या वतीने काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा केला जाणार आहे. 

एका भोंदू बाबाच्या रॅकेटमुळे बाळू लक्ष्मण पवार यांची जमीन सावकाराच्या ताब्यात गेली. तर त्याची खोट्या कागदपत्राद्वारे खरेदी करण्यात आलेली आहे. 7/12 उतार्‍यावर नांव लागल्यास मालकी सिध्द होत नाही. 7/12 हे महसुल जमा करण्यासाठी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने इतर जमीनीच्या वादात न्यायदान करताना स्पष्ट केले असून, पवार कुटुंबीयांना सावकारी शोषणातून न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे . 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News