रास्ता रोकोला मज्जाव करीत आंदोलकांना घेतले ताब्यात, येत्या काळात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार.. –


रास्ता रोकोला मज्जाव करीत आंदोलकांना घेतले ताब्यात, येत्या काळात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार.. –

शिर्डी, राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

शिर्डी कोपरगाव महामार्गावरील खड्यामुळे होणारे असंख्य अपघात टळावे व महामार्गावरील खड्यांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीनि एकत्र येत सावळीविहीर फाटा येथे नगर मनमाड महामार्गावर उतरत रास्ता रोको आंदोलनाचा पावित्रा हाती घेतला होता.मात्र शिर्डी पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलनासाठी जाऊ दिले नाही ,विद्यार्थ्यांनि रस्त्याच्या कडेला बसून झोपलेल्या शासनाच्या विरोधात सरकार हमको डरती हे ,पुलीस को आगे करती हे या पद्धतीची घोषणाबाजी केलीये मात्र विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने विध्यार्थी आंदोलनाच्या तयारीत असतांना शिर्डी पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले असून पोलिसांच्या व्हान मधुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.नगर मनमाड महामार्गाहुन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या विध्यार्थ्यांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय अशी प्रतिक्रिया महाविद्यालयिन विद्यार्थिनीनि व्यक्त केलीये.नगर मनमाड महामार्गाची डागडुजी करा या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागतो ही अत्यंत खेदाची बाब असून लवकरात लवकर नगर मनमाड महामार्ग व्यवस्थित करावा अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हजारोच्या संख्येने एकत्रित करत यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी नरेश सोनवणे शिर्डी शहर मंत्री, तुषार महाजन शिर्डी सहशहरमंत्री, कोमल राजपूत उत्तर नगर जिल्हा सह संयोजक, सिद्धेश्वर सोमाणी, नरेश पवार, मयूर चोळके, चेतन कोते, कोमल राजपूत, जागृती वाकचौरे, धनश्री राजपूत, प्रतीक पावडे, अनिकेत सोमवंशी, गोविंद चौधरी, विशाल बोरडे, साईप्रसाद वाणी, वैभव चोळके, प्रफुल खपके, साक्षी भन्साळी, वैष्णवी बनकर, मृणाली शेळके, राहुल ठुबे, साक्षी खटाळे, शिवानी जपे, साईसंपदा बलाळू, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

नगर मनमाड रोड वर रस्स्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला , काही अपंग झाले, अनेकांना मणक्याच्या आजाराला, डोळ्याच्या आजाराला सामोरे जावा लागत आहे ,तरीही येथील लोकप्रतिनिधी ,कार्यकर्ते गप्प का ,लोक प्रतिनिधींची काही जबाबदारी आहे की नाही या बद्दल राहाता तालुक्यात लोकप्रतिनिधी बाबत तीव्र रोष निर्माण होताना दिसत आहे ,त्यांना साधी दागडुगजी नीट करता येत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरून आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News