अहमदनगर जिल्ह्यात "भीमआर्मी" ची जोरदार एंट्री..


अहमदनगर जिल्ह्यात "भीमआर्मी" ची जोरदार एंट्री..

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

अल्पावधित देशात नावाजलेली चंद्रशेखर आझाद रावण यांच्या भीम आर्मीने अहमदनगर जिल्ह्यात जोरदार एंट्री केली आहे. एकाच दिवशी कोपरगांव, राहाता,नेवासा, राहूरी या परिसरात तब्बल 10 ठिकाणी संघटनेच्या शाखा नामफलकांचे उदघाटन ढोल ताजे ,फटाक्यांच्या आतिशबाजीत मोठ्या उत्साहात भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे व मुख्य संघटक दिपक भालेराव यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कर्तव्यदक्ष अहमदनगर जिल्हा प्रमुख तानसेन बिवाल राहूरी तालुकाध्यक्ष सनी काकडे, तालुका उपाध्यक्ष गुलशन बिवाल, शहराध्यक्ष बबन जगधने, शुभम बिवाल ,सचिन जगधने, अजय पवार, रवी माळी आदी.पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News