मराठी भाषा गौरव दिनी जाणून घ्या भाषेबद्दलच्या अभिमानास्पद गोष्टी!


मराठी भाषा गौरव दिनी जाणून घ्या भाषेबद्दलच्या अभिमानास्पद गोष्टी!

मराठी मायबोली लाभल्याचे भाग्य आपण अगदी अभिमानाने जगभर मिरवत असतो. आज मराठी माणूस देशाच्या नाही जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी चे नाव गाजवत आहे. 

आज मराठी भाषेच्या गौरव दिनी  मराठी लोक आणि भाषा जगभरात आपला डंका कसा गाजवत आहे, हे आपण जाणून घेऊ!

पाकिस्तानमध्ये कराची शहरात असलेली प्रतिष्ठित एन जे व्ही हायस्कूलचं पूर्ण नाव नारायण जगन्नाथ हायस्कूल असं आहे. मराठमोळ्या नारायण जगन्नाथ यांनी 1855 साली ही शाळा स्थापन केली होती. 

स्वातंत्र्याआधी मुंबई आणि कराची ही दोन्ही शहरं एकाच प्रांतात येत असल्याने अनेक मराठी भाषिकांची कराचीमध्ये ये-जा होती.

मराठीभाषिक फक्त महाराष्ट्रातच राहतात असं नाही तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या कर्नाटक, गोवा, गुजरात, छत्तीसगढ आणि तेलंगणासारख्या राज्यांमध्येच नाही तर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये लाखोंच्या संख्येने मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक आहेत. 

 मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी नाळ असणारे समाज पाकिस्तान आणि थेट अफगाणिस्तानात आजही आहेत असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पाक आणि अफगाणिस्तानातल्या बुगती, मारी तसंच बलोच समाजाची मुळं महाराष्ट्रातली आहेत असं तज्ज्ञांचं मत आहे. 

पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर विखुरलेल्या मराठा सैन्यातले अनेक गट वेगवगळ्या प्रांतात स्थिरावले. आता नव्या नावांनी ओळखले जाणारे हे समाज अशाप्रकारे महाराष्ट्रीयन वंशाचे आहेत.

 आपली भाषा, आपली संस्कृती हा आपला अभिमान आहे आणि म्हणूनच, मराठी भाषा गौरव दिनी प्रत्येकाने ती जपण्याचा निर्धार करायला हवा!


जाहिरात
Search
विडिओ
Recent News