श्रीगोंदा | जुगार अड्ड्यावर छापा


 श्रीगोंदा | जुगार अड्ड्यावर छापा

श्रीगोंदा  प्रतिनिधी अंकुश तुपे, तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्याना रंगेहाथ पकडुन ८ हजार ७२० रूपये रोख रकमेसह तीन मोटारसायकल असा एकुण ३लाख ५८हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ५ जणांवर कारवाई करण्यात आली.

       बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना कोंडेगव्हाण येथे मारुती मंदीराचे बाजुस वडाचे झाडाखाली उघडयावर जुगार चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पोलिस पथकाने छापा टाकला असता तेथे ५ जण तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ८ हजार ७२० रुपये रोख रक्कम, जुगार साहित्य, तीन मोटारसायकल असा एकुण ३लाख ५८हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पो. काँ. विकास कारखिले यांच्या फिर्यादीवरून रामनाथ कचरु मगर (वय २८) , भिवसेन दिलीप मगर (वय ३२), संतोष सुदाम मगर (वय ३८) वर्ष, उमेश दत्तात्रय गोंठे (वय ४३), राजु सर्जेराव साळवे (वय ३६) रा.कोडेगव्हाण यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, पो.ना.संतोष गोमसाळे,पठारे ज्ञानेश्वर, पो.कॉ.रामदास भांडवलकर, गोरख गायकवाड,विकास कारखिले, विकास सोनवणे यांनी केली आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News