विद्यालयातील विद्याथ्याची गळफास घेऊन आत्महत्या


विद्यालयातील  विद्याथ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

येथील  आबासाहेब काकडे कनिष्ठ विद्यालयाच्या  अकरावीच्या विद्यार्थ्याने विद्यालयाच्याच क्लास रुममध्ये  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली आहे. येथे आत्महत्ये बद्दल तर्कवितर्क चर्चिले जात असून अद्याप निश्चीत कारण समजू शकले नाही

        आदेश विजय म्हस्के (वय १८, रा. पवारवस्ती) असे आत्महत्या केलेल्या  विद्यार्थ्याचे नाव असून तो याच विद्यालयात अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत होता . त्याने विद्यालयाच्या रिकाम्या वर्गात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. सकाळी  अकरावीच्या वर्गात विद्यार्थी आले असता खिडकीतून शेजाराच्या रिकाम्या वर्गात छताच्या पाईपला तो गळफास घेवून लटकलेल्या स्थितीत आढळला .     

    .विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य करमसिंग वसावे यांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. सहा. पो. नि. सुजित ठाकरे, पो. उप निरीक्षक सोपान गोरे, पो. ना. अभिषेक बाबर, रामहरी खेडकर यांनी घटनास्थळी दाखल होत मयत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांसमक्ष पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

      आदेश काल बुधवारीच  , "मी दोन- तीन दिवस शाळेत येणार नाही अशी शिक्षकाची परवानगी घेऊन येतो " असे आईस सांगून  घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो लवकर घरी परत आला नसल्याने आई, लक्ष्मीबाईने  त्याचा सर्वत्र शोध घेतला . अखेर रात्री ११ वाजता शेवगाव पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती.याबाबत मयताचा चुलत भाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के यांनी आज पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली असून 

आदेश आत्महत्या करण्यासाठी  तेथे कसा गेला , गळफासासाठी त्याने वापरलेली ओढणी कोणाची, त्याने स्वतः आत्महत्या केली 

तेथे कसा गेला , गळफासासाठी त्याने वापरलेली ओढणी कोणाची, त्याने स्वतः आत्महत्या केली की   कोणी आत्महत्या करण्यासाठी त्यास भाग पाडले या सर्व बाबी पोलिस तपासत आहेत .

    या घटने बाबत शेवगाव चे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांचेशी अनेकदा संपर्क  संपर्क होवु शकला नाही. ते नगरला असल्याचे समजले . तर उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे  औरंगाबादला उच्चन्यायालयात  होते . त्यांनी आल्यानंतर  माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असे सांगितले .   

आदेश हा एकलकोंडा होता .कोणाशीही मिसळत नव्हता . अशी माहिती त्याच्या आईने दिली . सध्या त्याचीआई अधिक बोलण्याच्या मनस्थितीत नाही.  मानसिक असंतुलानातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्याने ओढणीही घरूनच नेली होती         ......अभिषेक बाबर 

(  हे . कॉ . शेवगाव पोलिस ठाणे .तपासी अधिकारी  )

जाहिरात
Search
विडिओ
Recent News