दौंड तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली, ग्रामीण भागात 11 तर शहरात 6 रुग्ण


दौंड तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली, ग्रामीण भागात 11 तर शहरात 6 रुग्ण

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढणे ही चिंतेची बाब असून लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,

उपजिल्हा रुग्णालय दौंड

आज दिनांक 25/2/21 रोजी एकूण  96 लोकांची covid antigen test करण्यात आली 

त्यांचा अहवाल खालील प्रमाणे

पॉझिटिव्ह--14,निगेटिव्ह--82

त्यामध्ये शहरी भागातील---6

ग्रामीण भागातील --8

पुरुष 9,आणि महिला 5 असे रुग्ण आढळल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली,तर ग्रामीण भागात तीन रुग्ण सापडल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी माहिती दिली आहे, कोरोना विषयी भीती बाळगण्यापेक्षा  काळजी घेणे ही काळाची गरज असून जनतेने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे यावर उत्तम पर्याय आहे, असे डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, तर तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीं केस पेपर वर आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर व्यवस्थित लिही त नसल्यामुळे आम्हाला पॉझिटिव रुग्णां पर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत असल्याची खंत डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News