मुर्टीच्या सरपंचपदी मंगल खोमणे तर उपसरपंचपदी किरण जगदाळे यांची निवड


मुर्टीच्या सरपंचपदी मंगल खोमणे तर उपसरपंचपदी किरण जगदाळे यांची निवड

बारामती : प्रतिनिधी(काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील मुर्टी याठिकाणी भैरवनाथ ग्रामविकास परीर्वतन पॅनलच्या म॑गल ईश्वर खोमणे यांचा सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी किरण जयसिंग जगदाळे याऺचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंच व उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीलकंठ मुळे व तलाठी प्रविण जोजारी, ग्रामसेवक एस.एस.थोरात यांनी काम पाहिले.

   यावेळी नवनिर्वाचित सदस्या सुप्रीया तानाजी राजपुरे, चेतना हरिदास जगदाळे, विकास पांडुरंग खोमणे, प्रियंका शिवाजी गदादे, माधुरी स्वप्निल चव्हाण, बाळासाहेब गुलाब जगदाळे, बापू जगताप, छाया पोपट मोरे, माजी सरपंच प्रियंका पोपट मोरे,  बाळासाहेब मारूती बालगुडे, हरिदास जगदाळे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

 सर्वात प्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी राहिलेली कामेही पूर्ण करणार आहे. गटातटाचे राजकारण न करता सर्वांचा एकोपा कसा एकत्र राहील असे काम करणार असल्याचेही उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर किरण जगदाळे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News